सद्गुरू जग्गी वासुदेव हे दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती, मेंदूची आपत्कालीन शस्त्रक्रिया पार पडली

अध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूला सूज आल्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात मेंदूची आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली.

अध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूला सूज आल्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात  मेंदूची आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली. 17 मार्च रोजी मेंदूला सूज आणि रक्तस्त्राव आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून सद्गुरूंना डोकेदुखीचा त्रास होत होता.

 

 

डॉक्टरांच्या पथकाने केले यशस्वी ऑपरेशन - 
दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सद्गुरूंच्या मेंदूवर एक जटिल आणि यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अपोलोच्या टीमचे डॉ. विनीत सुरी, डॉ. प्रणवकुमार, डॉ. सुधीर त्यागी आणि डॉ. एस. चॅटर्जी यांनी सद्गुरु जग्गी यांच्या मेंदूवर तातडीची शस्त्रक्रिया केली. ऑपरेशननंतर सद्गुरूंनाही व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे. ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Share this article