Air Ambulance Crash : रांचीहून निघालेले चार्टर्ड विमान 20 मिनिटांत क्रॅश, 7 जणांचा मृत्यू

Published : Feb 24, 2026, 07:18 AM IST

Air Ambulance Crash : रांचीहून दिल्लीला निघालेली एअर ॲम्ब्युलन्स उड्डाणानंतर अवघ्या २० मिनिटांत रडारवरून गायब कशी झाली? झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील जंगलात विमानाचे अवशेष सापडले असून, ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

PREV
15
रांचीच्या देवकमल हॉस्पिटलचे सीईओ अनंत सिन्हा यांनी सांगितलं की, त्यांच्या एका रुग्णाच्या कुटुंबीयांनी ही एअर ॲम्ब्युलन्स बुक केली होती. ते म्हणाले, "लातेहार जिल्ह्यातील चंदवा येथील रहिवासी असलेले रुग्ण संजय कुमार (४१) यांना १६ फेब्रुवारी रोजी ६५ टक्के भाजलेल्या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते." कुटुंबीयांनी त्यांना चांगल्या उपचारांसाठी दिल्लीला नेण्याचा निर्णय घेतला. सोमवारी संध्याकाळी करीब ४.३० वाजता ते हॉस्पिटलमधून दिल्लीसाठी निघाले. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते चंपई सोरेन यांनी X वरील एका पोस्टमध्ये या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं.
25
हा अपघात झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरिया परिसरात झाला. विमानाने संध्याकाळी ७:११ वाजता रांची विमानतळावरून उड्डाण केलं. सुमारे २० मिनिटांनंतर त्याचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. DGCA च्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३४ वाजता विमानाचा कोलकात्याशी शेवटचा संपर्क झाला, त्यानंतर विमान रडारवरून गायब झालं.
35
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) नुसार, ही फ्लाईट रेडबर्ड एअरवेज कंपनीची होती आणि विमानाचं मॉडेल बीचक्राफ्ट C90 होतं. विमानाने संध्याकाळी ७:११ वाजता रांचीहून उड्डाण केलं. सुमारे ७:३४ वाजता कोलकाता कंट्रोलशी संपर्क झाल्यानंतर अचानक रडार आणि कम्युनिकेशन दोन्ही बंद पडलं. सूत्रांनुसार, संपर्क तुटण्यापूर्वी पायलटने खराब हवामानामुळे मार्ग बदलण्याची विनंती केली होती. या अपघाताला हवामान जबाबदार होतं की तांत्रिक बिघाड? या सर्व बाजूंची चौकशी आता एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AAIB) करत आहे.
45
एअर ॲम्ब्युलन्स हे सामान्य प्रवासी विमान नसतं. यात ॲडव्हान्स मेडिकल उपकरणं, ICU सारखी सुविधा आणि डॉक्टर-पॅरामेडिकची टीम असते. रुग्णाला प्रवासातही सतत उपचार देणं हा याचा उद्देश असतो. पण जेव्हा अशी फ्लाईटच अपघाताचा बळी ठरते, तेव्हा प्रश्न अधिक गंभीर होतात.
55
एव्हिएशन तज्ज्ञांच्या मते, विमान अपघात अनेक कारणांमुळे होऊ शकतात - जसं की खराब हवामान, तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा देखभालीतील कमतरता. रांची विमानतळाच्या अधिकाऱ्यांनीही हवामान हे एक कारण असू शकतं असं मानलं आहे, पण खरं कारण तपास अहवालानंतरच समोर येईल. या अपघातात दोन पायलट, एक रुग्ण, दोन अटेंडंट, एक डॉक्टर आणि एका पॅरामेडिकचा जीव गेला. चतराच्या जंगलात क्रॅश साईट सापडल्यानंतर बचाव पथकाने सर्वांचे मृतदेह बाहेर काढले.
Read more Photos on

Recommended Stories