32 वर्षांचा इंजिनियर झाला करोडपति, महिन्याभराच्या नोकरीत जमवली कोट्यावधींची रोकड

राजस्थानमधील अलवर पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक दिव्यांग त्यागीला 2.50 लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. ठेकेदाराकडून तीन टक्क्यांच्या कमीशनची मागणी केल्यानंतर एसीबीकडून कार्यवाही करण्यात आली आहे.

Chanda Mandavkar | Published : Sep 18, 2024 5:00 AM IST

Rajasthan : राजस्थानमधील अलवर पाणीपुरवठा विभागातील अधिक्षक दिव्यांग त्यागीला नुकतेच लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. जयपुरमधील एसबीच्या टीमने लाच घेताना त्यागीला अटक केली आहे. त्यागीवर असा आरोप आहे की, ठेकेदार विजय कुमारकडून तीन टक्क्ये कमीशनची मागणी केली होती. यासाठी त्यागीने 2.50 लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीनंतर एसीबीच्या दोन पथकांनी संयुक्त कार्यवाही करत त्यागीला लाच घेताना रंगेहाथ पकडले. एवढेच नव्हे लाच घेतल्याची रक्कम मोजण्यासाठी पैसे मोजण्याची मशीन आणावी लागली.

बिल पास करण्यासाठी मागितली होती लाच
जयपुरमधील एसीबी टीमचे अतिरिक्त पोलीस आयुक्त बलराम मीणा यांच्यानुसार, विजय कुमारला सव्वा कोटी रुपयांचे बिलांचे पेमेंट करायचे होते. हे बिल पास करण्यासाछी दिव्यांग त्यागीने तीन टक्के कमीशनची मागणी केली होती. 14 सप्टेंबरला तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने प्रकरणाची पुष्टी केली. तर त्यागीने आधीच दीड लाख रुपये देखील ठेकेदाराकडून घेतले होते.

एसीबीच्या पथकाकडून छापेमारी
तक्रारकर्त्याला आंबेडकरनगर बस स्टँडजवळ बोलावले. तेथे एका गाडीत बसत त्यागीने ठेकदाराकडून एक लाख रुपयांची रोकड घेतली. यानंतर एसीबीने त्यागीच्या घरावर छापेमारी केली. येथून 60 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय

पत्नीही पाणीपुरवठा विभागात कार्यरत
त्यागी अलवरमध्ये कार्यकरत होता. त्याची पत्नी विभा देखील पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहे. या प्रकरणात सध्या अधिक तपास सुरू आहे. लवकरच संपूर्ण रक्कमेचा खुलासा होईल असे सांगितले जात आहे. त्यागीकडे दोन आलिशान कार असून त्याची किंमत 50 लाख रुपये आहे. याशिवाय आलिशान परिसरात कोट्यावधी रुपयांचे घरही आहे. बँक लॉकर्समध्ये सोनेही असल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा : 

मोबाईल स्टेटसने केला घात: दागिन्यांवरून पतीने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या

'बाई काय प्रकार', मॉलच्या VIP बाथरुबाहेर तैनात महिलेची ग्राहकांकडे विचित्र मागणी

Share this article