संजय शिरसाटांच्या नावाने पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करा | Food Contract | Raj Thackeray

संजय शिरसाटांच्या नावाने पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करा | Food Contract | Raj Thackeray

Published : Aug 12, 2026, 03:03 PM IST

सामाजिक न्याय विभागातील भोजन ठेक्यांमध्ये subcontractor पद्धतीमुळे जेवणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं असून, यावर कडक उपाययोजना करण्याचा विभागाचा विचार सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच संबंधित वास्तूंच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील एक ते दीड महिन्यात इमारती खाली करून विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्याची आणि जास्तीत जास्त तीन महिन्यांत इमारती पाडण्याची प्रक्रिया होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विविध हॉस्टेलमध्ये बाहेर नोकरी किंवा व्यवसाय करणारे लोक विद्यार्थी म्हणून राहत असल्याच्या तक्रारींबाबतही शिरसाट यांनी गंभीर कारवाईचे संकेत दिले. प्रत्येक हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचा डेटा तपासून अनधिकृतपणे राहणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात 36 हजार उद्योग बंद पडल्याच्या दाव्यावर आपल्याकडे सध्या माहिती नसल्याचं सांगताना संभाजीनगरमध्ये सुमारे 70 हजार कोटींचे उद्योग आणि प्रकल्प सुरू असल्याचं शिरसाट यांनी नमूद केलं. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत शिरसाट यांनी संवादातून प्रश्न सुटतात, अशी भूमिका घेतली. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा या आठवड्यात सुटण्याची शक्यता असून, पालकमंत्र्यांच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन होईल, असंही त्यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे मंत्र्यांच्या खात्यांचा आढावा घेत असल्याबाबत त्यांनी ही नियमित प्रक्रिया असल्याचं सांगितलं. तसेच महानगरपालिकांच्या नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिरांची मालिका सुरू असल्याचं स्पष्ट केलं. संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांवर मागच्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा पुढील राजकीय कारवाईवर लक्ष असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं आणि महिनाभरात काही मोठ्या घडामोडी दिसतील, असा दावा केला. दरम्यान, संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्या नावाने महिलांकडून 500 रुपये घेऊन थायलंड ट्रिपला नेण्याचं आमिष दाखवणाऱ्या 70 वर्षीय महिलेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या नावाने कोणी पैसे मागत असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन शिरसाट यांनी केलं.

05:53मोदींचा फोटो हटवल्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले? | Amit Thackeray | Manoj Jarange
05:36अन्नसाठ्यात फेरफार; पोलीस-FDAची कंपनीवर कारवाई | FDA | Food Safety
03:09विद्यार्थी आंदोलनांच्या FIRवर अभिजीत दिपकेंचे मत | CJP | Student Protest
04:427.8% GDP Growth | GDP वाढीवर एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला | Eknath Shinde
04:09उदय सामंतांचा राऊतांना टोला; ऑपरेशन टायगरवर दावा | 7.8% GDP Growth | Sanjay Raut
04:02अमित ठाकरे यांनी फोटो हटवला, यावर संजय राऊत म्हणतात sanjay raut
03:17भाजपा नेत्यांना भाषण माफिया का म्हणाले संजय राऊत | Sanjay Rahut on BJP
03:28CJP ला काँग्रेस जिताओ पार्टी म्हटल्यावर, संजय राऊत यांची भाजपावर प्रतिक्रिया
01:08मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest
09:03मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest