लोकसभेत काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर, राहुल गांधी यांनी घातलेल्या शूची किंमत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. काही जणांनी शूची किंमत ३ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली: लोकसभा विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी घातलेले शूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्या किमतीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी लोकसभा आवारात काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले होते. या सर्व घडामोडींमध्ये राहुल गांधी यांनी घातलेल्या शूंच्या किमतीबाबतही चर्चा सुरू आहेत. यापूर्वी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी घातलेल्या टी-शर्टच्या किमतीचे फोटो व्हायरल झाले होते.
सोशल मीडियावर 'महंत आदित्यनाथ २.०' नावाच्या एक्स अकाउंटवर राहुल गांधी यांनी घातलेल्या शूची किंमत असलेला फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोसोबत, राहुल गांधी यांनी ३ लाख रुपयांचे शू घातले आहेत, असे लिहिण्यात आले आहे. तसेच गौरीश बंसल नावाच्या एक्स अकाउंटवर, राहुल गांधी यांनी घातलेल्या शूची किंमत किती आहे ते पाहा, असे लिहिण्यात आले आहे. ते दररोज अदानी, अंबानींबद्दल वाईट बोलतात. मोदींना भांडवलदारांचे मित्र म्हणून टीका करतात. पण त्यांच्याकडे इतके महागडे शू सोरोसच्या पैशांनी येतात का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
आणखी एका नेटकऱ्याने @alkumar25000 यांनी राहुल गांधी यांचा फोटो शेअर करून, हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून, काँग्रेस नेत्याने घातलेल्या शूची किंमत ३ लाख रुपये आहे. इतक्या महागड्या किमतीचे शू असतात हे कळले, असे लिहिले आहे.
गुरुवारी लोकसभा आवारात काँग्रेस नेते आंबेडकरांबद्दल अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत निदर्शने करत होते. तर अमित शहा यांचे वक्तव्य तोडमोड करून व्हायरल करण्यात आले आहे, असा आरोप करत भाजप खासदार निदर्शने करत होते. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी भाजप खासदार प्रताप सारंगी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. राहुल गांधी यांनी खासदारांना ढकलले. यावेळी एक खासदार माझ्यावर पडल्याने डोक्याला दुखापत झाली, असे भाजप खासदाराने सांगितले.