Rahul Gandhi Protest: 'हवं तर मला उचलून फेका, पण निवडणूक आयुक्तांना भेटल्याशिवाय हटणार नाही'; राहुल गांधींचा इशारा

vivek panmand   | CMS
Published : Oct 06, 2026, 06:00 PM IST
photo

सार

राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचे खासदार निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी दिल्लीत रस्त्यावर उतरले आहेत. जोपर्यंत आयुक्तांची भेट होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, अशी ठाम भूमिका राहुल आणि प्रियांका गांधींनी घेतली आहे. सध्या पोलीस आणि नेत्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

दिल्ली: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या खासदारांना निवडणूक आयुक्तांना भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. यावर निर्णय झाला नाही तर आमचं आंदोलन असंच सुरू राहील, असं ते म्हणाले. तुम्हाला हवं तर बळाचा वापर करून मला इथून हटवू शकता, असा इशाराही राहुल गांधींनी दिला. पोलीस आम्हाला इथे बसू नका सांगत आहेत, मग आम्ही जायचं कुठे? असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधींच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाला निवेदन देण्याची तयारी सध्या सुरू आहे. पुढच्या एका तासात हे नेते आयोगाची भेट घेण्याची शक्यता आहे. सध्या निवेदनाचा मसुदा तयार करण्याचं काम सुरू आहे.

दुसरीकडे, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने डीसीपींच्या माध्यमातून प्रियांका गांधी यांच्याशी चर्चा केली. पण, निवडणूक आयुक्तांना भेटल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, यावर प्रियांका गांधी ठाम आहेत. पोलिसांनी के. सी. वेणुगोपाल यांच्याशीही पुन्हा चर्चा केली. याच गोंधळात, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांना ज्या बसमध्ये बसवलं होतं, त्या बसची हवा एका कार्यकर्त्याने सोडून दिली. एवढंच नाही तर तो बसची चावी घेऊन पसार झाला. काँग्रेस खासदारांनी एकमेकांचे हात धरून साखळी करत आंदोलन केलं. यावेळी शफी परंबिल आणि अँटो अँटनी यांना हटवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video: अनवाणी पाय आणि नेसलेली साडी, होमगार्ड होण्यासाठी झारखंडच्या महिलेची १६०० मीटरची धाव
Rahul Gandhi Protest : पुन्हा एकदा हादरली देशाची राजधानी, दिल्लीत नेमकं चाललंय तरी काय?