माजी भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी आपल्या पुस्तकात भारत आणि पाकिस्तानमधील 'कत्ल की रात' ची कथा शेअर केली आहे. खरंतर हे प्रकरण विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेशी संबंधित आहे.
Qatal Ki Raat : माजी भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया (Ajay Bisaria) यांनी आपले पुस्तक 'अँगर मॅनेजमेंट : द ट्रबल डिप्लोमेटिक रिलेशनशिप बिट्वीन इंडिया अॅण्ड पाकिस्तान’ मध्ये (Anger Management: The Troubled Diplomatic Relationship between India and Pakistan) 27 फेब्रुवारी, 2019 च्या रात्रीचे वर्णन केले आहे.
भारतीय विंग कमांडर अभिनंदन (Wing Commander Abhinandan) यांची अटक आणि सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुढे येऊन काही पाऊले उचलली होती. यामुळे पाकिस्तानला काहीही करून विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करणे भागच होते. बिसारिया यांनी आपल्या पुस्तकात असा खुलासा केलाय की, पंतप्रधानांनी ‘कत्ल की रात’ वेळी पाकिस्तानला 9 क्षेपणस्रांची भीती दाखवली होती. यामुळेच पाकिस्तानला अभिनंदनला सोडावे लागले होते.
पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्त राहिलेत अजय बिसारिया
पाकिस्तानातील माजी भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना भारत-पाकिस्तानदरम्यानच्या कत्ल की रातचा खुलासा केला आहे. भारतीय विंग कमांडर अभिनंदन याच्या अटकेनंतर 27 फेब्रुवारी, 2919 रोजी रात्री नवी दिल्ली आणि इस्लामाबाद यांच्यामध्ये राजकीय डावपेच झाल्याचे पुस्तकात लिहिले आहे.
भारताने हल्ल्याची केली होती तयारी
अजय बिसारिया यांच्या मते, 9 क्षेपणस्राचा हल्ला आपल्यावर केला जाईल अशी भीती पाकिस्तानच्या सरकारला वाटत होती. याशिवाय पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बातचीत करण्याची मागणी करण्यात आली होती. या रात्रीलाच पंतप्रधानांनी 'कत्ल की रात' असे संबोधले होते. यानंतर दोन दिवसातच विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करण्यात आली होती.
मध्यरात्री केला होता फोन
बिसारिया यांनी पुस्तकात लिहिलेय की, कशाप्रकारे मध्यरात्री तत्कालीन पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल महमूद यांचा फोन आला होता. यामध्ये इमरान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी पंतप्रधान उपलब्ध नव्हते. बिसारिया यांनी म्हटले की, कोणताही महत्त्वाचा मेसेज त्यांना थेट पाठवता येऊ शकतो. या फोननंतर इमरान खान यांनी शांततेचा हवाला देत विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केली होती.
आणखी वाचा :
अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी केला सामूहिक बलात्कार, हत्येचाही केला प्रयत्न