१ डिसेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या खेळाडू वू लुओ यु हिला हरवून सिंधूने जेतेपद पटकावले. दुसरीकडे, लक्ष्य सेननेही आपल्या विजयासह साथ दिली. तसेच, त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद पुल्लेला या जोडीनेही चांगली कामगिरी करत महिला दुहेरी जेतेपद पटकावले. आता पीव्ही सिंधूच्या लग्नामुळे डिसेंबर महिन्यात भारतीय बॅडमिंटन जगतात हा आनंद द्विगुणित होत आहे!