४६ किमी प्रवासासाठी ५ तास लागणारी भारतातील सर्वात धीमी रेल्वे
बुलेट ट्रेन, हायस्पीड रेल्वेला आता मागणी जास्त आहे. कितीही दूरचा प्रवास असला तरी लगेच पोहोचायचे आहे. वेळ वाचवायचा आहे. पण भारतातील ही रेल्वे याच्या उलट आहे. केवळ ४६ किलोमीटरच्या प्रवासासाठी ही रेल्वे तब्बल ५ तास घेते.
भारतीय रेल्वेच्या प्रत्येक रेल्वेत एकेक वैशिष्ट्य आहे. नीलगिरी माउंटन रेल्वेचा प्रवास अत्यंत धीमा आहे. ४६ किलोमीटरच्या प्रवासासाठी ही रेल्वे ५ तास घेते.
ही विशेष रेल्वे नीलगिरी टेकड्यांमधून जाते. ताशी ९ किलोमीटर वेगाने धावते. पण प्रवाशांना कंटाळा येत नाही.
नीलगिरी माउंटन रेल्वे मेट्टुपालयम ते उटी असा प्रवास करते. ४६ किलोमीटरचा प्रवास टेकड्यांमधून होतो. हा मीटर गेज रेल्वे मार्ग आहे.
या ४६ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर १६ बोगदे, २५० पूल आणि २०८ धोकादायक वळणे आहेत. कल्लार आणि कूनूर दरम्यान कमाल वेग १३ किलोमीटर आहे.
पर्वतरांगांमधून रेल्वे अतिशय हळू जाते. ४६ किलोमीटरच्या प्रवासात निसर्गातील सुंदर ठिकाणे पाहता येतात.
पावसाळ्यात या रेल्वेने प्रवास करणे आनंददायी असते. नीलगिरीत सरासरी १२५० मिमी पाऊस पडतो.