पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीत केली ध्यानधारणा, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यानधारणा करण्यासाठी गेले होते. त्यांनी येथे जाऊन ध्यान केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
vivek panmand | Published : May 31, 2024 5:54 AM IST / Updated: May 31 2024, 11:25 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीत भगवती अम्मान मंदिरात केली पूजा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी येथे भगवती अम्मान मंदिरात पूजा केली. येथे पोहचल्यानंतर त्यांनी सर्वात आधी पूजा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मोदी रॉक मेमोरियलमध्ये करणार ध्यान
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रॉक मेमोरियलमध्ये ध्यान करणार असून तेथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पूर्वी स्वामी विवेकानंद यांनी येथेच केले होते ध्यान
स्वामी विवेकानंद यांनी येथेच पूर्वी ध्यान धारणा केली होती असेही सांगण्यात येत आहे. तेथे नरेंद्र मोदी हे ध्यानधारणा करत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचले कन्याकुमारीला
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला पोहचले आहेत. येथे ते रॉक मेमोरियलमधील दगडी स्मारक पाहणार आहेत.
विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये करणार ध्यान धारणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पोहचल्यानंतर त्यांनी ध्यानधारणा केली. स्वामी विवेकानंद यांनी येथे ध्यानधारणा केल्यामुळे या ठिकाणाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
विवेकानंद रॉक मेमोरियलबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
विवेकानंद रॉक मेमोरियल हे कन्याकुमारीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ बांधण्यात आले आहे. ते समुद्रातून बाहेर पडलेल्या खडकावर बांधण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्यानधारणा करताना फोटो झाले व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्यानधारणा करत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये ते ध्यानाच्या मुद्रेत ध्यान करत असल्याचे दिसून आले आहे.