नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीतील सरकारी कार्यक्रमादरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी उत्साह वाढवला. दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गेल्या १० वर्षांपासून दिल्लीला एका मोठ्या 'आप-दा' वेढले आहे, असे पंतप्रधानांनी उपहासात्मकपणे सांगितले. अण्णा हजारे यांना पुढे करून काही कट्टर अप्रामाणिक लोकांनी दिल्लीला 'आप-दा'मध्ये ढकलले.
'आप' सरकारविरोधात पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिल्ली गेल्या 10 वर्षांपासून एका मोठ्या 'आप-दा'(आपत्तीने) घेरले आहे. अण्णा हजारे यांना पुढे करून काही कट्टर अप्रामाणिक लोकांनी दिल्लीला 'आप-दा'ध्ये ढकलले. दारूच्या दुकानात घोटाळा, मुलांच्या शाळांमध्ये घोटाळा, गरिबांच्या उपचारात घोटाळा, प्रदूषणाशी लढण्याच्या नावाखाली घोटाळा, नोकरभरतीत घोटाळा सुरू आहे. हे लोक दिल्लीच्या विकासाबाबत बोलत होते परंतु हे लोक 'आप-दा' बनुन दिल्लीवर तुटून पडले आहेत. हे लोक उघडपणे भ्रष्टाचार करतात आणि नंतर त्याचा गौरवही करतात. यामुळेच दिल्लीतील जनतेने 'आप' विरुद्ध युद्ध सुरू केले आहे. दिल्लीच्या मतदारांनी दिल्लीला 'आप-दा' मुक्त करण्याचा निर्धार केला आहे
आणखी वाचा-
४५० कोटींच्या चिटफंड घोटाळ्यात गिलसह ४ क्रिकेटपटूंना CID ची नोटीस?