
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (30 डिसेंबर 2023) अयोध्या धाम रेल्वे स्टेशनवर दोन अमृत भारत (Amrit Bharat Express) आणि सहा वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) अशा एकूण आठ एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
अमृत भारत एक्सप्रेसमध्ये नॉन एसी डबे, अनारक्षित तिकिटांचे डबे यासह अनेक फायदे प्रवाशांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रवास सुपरफास्ट व्हावा, यासाठी अमृत भारत एक्सप्रेसच्या दोन्ही बाजूंना इंजिन बसवण्यात आले आहेत.
या ट्रेनमुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे. ट्रेनमध्ये सुंदर डिझाइन असलेली आसने, उत्तम लगेज रॅक, मोबाइलसाठी चार्जिंग पॉइंट, एलइडी लाइट, सीसीटीव्ही आणि सार्वजनिक माहिती प्रणाली यासह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांनाही दाखवला हिरवा झेंडा दाखवला. यापैकी दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या दक्षिण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. या एक्सप्रेस कोईम्बतूर जंक्शन-बंगळुरू कॅन्टोन्मेंट-कोईम्बतूर वंदे भारत एक्सप्रेस आणि मंगळुरू सेंट्रल-मडगाव-मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस अशा आहेत.
नवीन कोईम्बतूर-बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस ही बंगळुरू-कोईम्बतूर सेक्टरमधील सर्वात वेगवान ट्रेन असणार आहे. ही ट्रेन कोइम्बतूर-बंगळुरू कॅन्टोन्मेंट दरम्यानचे 380 किमीचे अंतर 6 तास 20 मिनिटांत पूर्ण करेल आणि 6 तास 30 मिनिटांत ट्रेन परतीचा प्रवास करेल.
कोईम्बतूर-बंगळुरू कॅन्टोन्मेंट वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्याने तामिळनाडूला पाचवी वंदे भारत सेवा मिळणार आहे. ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस कोईम्बतूर- बंगळुरू शहरांना जोडण्याचे काम करणार आहे. तामिळनाडू आणि कर्नाटकला जोडणारी ही दुसरी वंदे भारत ट्रेन आहे.
आणखी वाचा :
अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पाहा PHOTOS
UP मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अयोध्येत स्वागत, पाहा PHOTOS
मीरा मांझीच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला चहाचा आस्वाद, मुलांचेही केले कौतुक पाहा PHOTOS