
दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून बिहार SIR प्रकरणावरून मोठं वादळ उठल्याच दिसून आलं आहे. पण या सर्वात रविवारी सकाळी एक अशी गोष्ट घडली असून त्यामुळं संपूर्ण देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटले आणि त्या भेटीनंतर चार तासांमध्ये अमित शहा त्यांना जाऊन भेटले.
दोन नेते एकाच वेळेस राष्ट्रपतींना का भेटले यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र एकाच दिवशी काही तासांच्या अंतराने भेट घेतल्यामुळं ही सामान्य स्वरूपाची भेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मताने सरकार काही मोठा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळं ही भेट चर्चेत आली आहे. यावेळी धनखड यांना निरोप द्यावा लागणार असून त्याच्या कार्यक्रम नियोजनासाठी भेट झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. एखादे महत्वाचे विधेयक मांडायचे असल्यास अशा प्रकारची भेट होऊ शकते. त्यामुळं नेमकी भेट कशासाठी झाली हे अजूनही समजलेलं नाही.
मोठा राजकीय किंवा घटनात्मक निर्णय घ्यायचा असल्यास राष्ट्रपतींची भेट घेतली जाते. त्यामुळं आता असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळं त्यांच्या जागेसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राष्ट्रपती यांची भेट घेतल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काश्मीर किंवा ईशान्य भागाबद्दल एखादा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यामुळं काश्मीरमध्ये सुरक्षा ऑपरेशन तीव्र करण्यात आले आहेत. यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राष्ट्रपतींनी सुरक्षाविषयक माहितीची अपडेट घेतली आहे.