
President Droupadi Murmu Flies Rafale Fighter : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी हरियाणातील अंबाला एअर फोर्स स्टेशनवरून राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केले. असे करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर असलेल्या राष्ट्रपतींनी उड्डाण करण्यापूर्वी एअरबेसवर औपचारिक गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला. सशस्त्र दलांसोबतच्या त्यांच्या सहभागातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी पाकिस्तानचा खोटारडेपणाही उघड केला. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदुरच्या वेळी पकडल्याचा दावा केलेल्या महिला वैमानिकासोबत त्यांनी फोटो काढला.
राष्ट्रपती भवनाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, 'भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू, उद्या अंबाला, हरियाणा येथे भेट देतील, जिथे त्या राफेलमधून उड्डाण करतील.' राष्ट्रपती मुर्मू १८ ऑक्टोबर रोजी अंबाला दौऱ्यावर जाणार होत्या, परंतु काही अज्ञात कारणांमुळे त्यांना आपला दौरा पुढे ढकलाावा लागला होता.
फ्रेंच-निर्मित लढाऊ विमान राफेल असलेल्या सर्वात जुन्या भारतीय हवाई दलाच्या तळांपैकी एकाला दिलेली ही त्यांची पहिलीच भेट आहे.
भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर असलेल्या राष्ट्रपतींनी उड्डाण करण्यापूर्वी एअरबेसवर औपचारिक गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला. सशस्त्र दलांसोबतच्या त्यांच्या सहभागातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांनी ८ एप्रिल २०२३ रोजी आसाममधील तेजपूर एअर फोर्स स्टेशनवर सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानातून ऐतिहासिक उड्डाण केले होते. राष्ट्रपतींनी सुमारे ३० मिनिटे उड्डाण केले, ज्यात त्यांनी हिमालयाचे दृश्य पाहत ब्रह्मपुत्रा आणि तेजपूर खोऱ्याचा परिसर व्यापला आणि त्यानंतर त्या एअर फोर्स स्टेशनवर परतल्या.
हे विमान १०६ स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन नवीन कुमार यांनी उडवले होते. विमान समुद्रसपाटीपासून सुमारे दोन किलोमीटर उंचीवर आणि सुमारे ८०० किलोमीटर प्रतितास वेगाने उडत होते.
असे उड्डाण करणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत.
नंतर अभ्यागत पुस्तिकेत, राष्ट्रपतींनी एक छोटी नोंद लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, ज्यात त्यांनी लिहिले होते: 'भारतीय हवाई दलाच्या शक्तिशाली सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानातून उड्डाण करणे हा माझ्यासाठी एक रोमांचक अनुभव होता. भारताची संरक्षण क्षमता जमीन, हवा आणि समुद्र या सर्व सीमांवर मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे, ही अभिमानाची बाब आहे.'
'या उड्डाणाचे आयोजन केल्याबद्दल मी भारतीय हवाई दल आणि एअर फोर्स स्टेशन तेजपूरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करते.'
त्यांच्या आधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि एपीजे अब्दुल कलाम यांनीही लढाऊ विमानातून उड्डाण केले होते.