हेलिकॉप्टरमध्ये बसून पंतप्रधानांनी टॅबलेटवर राम लल्लाचे सूर्य टिळक पाहिले - पाहा व्हिडिओ

Published : Apr 17, 2024, 02:40 PM ISTUpdated : Apr 17, 2024, 02:41 PM IST
Narendra Modi saw Ramlala Surya Tilak video

सार

रामनवमीनिमित्त बुधवारी दुपारी 12 वाजता अयोध्येतील भव्य राम मंदिरात राम लल्लाचा सूर्य टिळक सोहळा पार पडला. यादरम्यान तीन मिनिटे राम लल्लाचा सूर्याभिषेक झाला.

रामनवमीनिमित्त बुधवारी दुपारी 12 वाजता अयोध्येतील भव्य राम मंदिरात राम लल्लाचा सूर्य टिळक सोहळा पार पडला. यादरम्यान तीन मिनिटे राम लल्लाचा सूर्याभिषेक झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील नलबारी येथे सभा घेत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
रॅलीनंतर पंतप्रधान हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये बसले. यावेळी त्यांना राम लालाचे सूर्य टिळक टॅबलेटवर दिसले. सूर्य टिळक विधी पाहताना त्यांनी चपला काढल्या होत्या. या संदर्भात, पंतप्रधानांनी ट्विटरवर पोस्ट केले, "नलबारी सभेनंतर, मला अयोध्येतील रामललाच्या सूर्य टिळकांचा अद्भुत आणि अद्वितीय क्षण पाहण्याचे सौभाग्य मिळाले. श्री रामजन्मभूमीचा हा बहुप्रतिक्षित क्षण सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. हे सूर्य टिळक विकसित भारताच्या प्रत्येक संकल्पाला आपल्या दैवी उर्जेने प्रकाशित करतील.

राम लल्लाच्या चेहऱ्यावर लावण्यात आला खास लेप 
राम लल्लाच्या चेहऱ्यावर यावेळी खास लेप लावण्यात आला होता. रामाचा चेहऱ्यावर तेज यावे म्हणून चंदनाचा लेप यावेळी लावण्यात आला. चंदनाच्या लेपाने सूर्य टिळक स्पष्टपणे दिसणार होते. यानंतर एक माणिकाचा चुत करूनही तो चेहऱ्याला लावण्यात येणार होता. त्यामुळे सूर्य टिळक स्पष्टपणे दिसले असते. अयोध्येमध्ये भक्तांनी रामाचे दर्शन घ्यायला गर्दी केली आहे. तुम्हालाही राम लल्लाचा सूर्य टिळक ऑनलाइन पाहायचा असेल तर खाली दिलेला व्हिडिओ पहा.

आणखी वाचा - 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड मध्ये माओवादीविरोधात मोठी कारवाई ; 29 माओवाद्यांना कंठस्नान
अमित शाह यांच्या ऑफिसला लागली आग, गृह खात्याचे महत्वपूर्ण कागदपत्रे जळाल्याची शक्यता?

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

Recommended Stories

Airport Privatisation: हुबळीसह देशातील ११ विमानतळ ५० वर्षांसाठी खाजगी हातात, डिसेंबरमध्ये निघणार टेंडर!
Vande Bharat Express: 'वंदे भारत'चा प्रवास खूप सुरक्षित वाटला; लिथुआनियाच्या तरुणीचा अनुभव व्हायरल