पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार देशातील पहिल्या 'अंडर वॉटर मेट्रो' प्रकल्पाचे उद्घाटन, जाणून घ्या खासियत

भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (6 मार्च) उद्घाटन केले जाणार आहे. सध्या पंतप्रधान पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत.

Chanda Mandavkar | Published : Mar 6, 2024 5:05 AM IST / Updated: Mar 06 2024, 01:13 PM IST

India First Underwater Metro :  कोलकाता येथे आज सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. कोलकातामधील हुगळी नदीत खालून प्रवास करणार असून हावडा शहराला थेट सॉल्ट लेकशी जोडली जाणार आहे. यादरम्यान, तीन मेट्रो स्थानक भूमिगत असणार आहेत. या प्रकल्पासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. खासियत अशी की, अंडर वॉट मेट्रो जमिनीच्या पृष्ठभागापासून 33 मीटर खोल आहे.

हुगळी नदीखालील अंडरवॉटर भुयाराबद्दलच्या खास गोष्टी

भारतातील पहिली मेट्रो कुठे सुरू झाली होती?
भारतातील पहिली आणि आशिया खंडातील पाचवी मेट्रोची सुरूवात कोलकाता येथे झाली होती. याची सुरूवात 40 वर्षांपूर्वी 24 ऑक्टोंबर 1984 रोजी झाली होती. मेट्रो वेबसाइटच्या मते, या मेट्रोने एस्प्लेनेड आणि नेताजी भवनादरम्यान पाच स्थानकांसह 3.40 किमीचा प्रवास केला होता.

पाण्याखाली ट्रेनसाठी बोगदा तयार करण्याचा विचार ब्रिटिश काळातील
बीबीसीच्या रिपोर्ट्सनुसार, पश्चिम बंगालमध्ये जन्मलेले ब्रिटिश इंजिनिअर हार्ले डेलरिम्पल-हे यांनी एका शकताआधी कोलकाता आणि हावडाला जोडणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी 10.6 किमी अंतर असलेल्या भूमिगत रेल्वेचा विचार केला होता. या योजनेत हुगळी नदीखाली एक बोगदा आणि 10 थांब्यांचा समावेश होता. दरम्यान, पैशांचे आव्हान आणि शहराच्या रुपरेषेमुळे ही योजना कधीच पूर्ण झाली नाही.

यानंतर वर्ष 1928 मध्ये शहराला वीज पुरवठा करणारी कंपनी सीईएससीने वीज केबलसाठी हुगळी नदीखाली बोगदा तयार करण्यासाठी हार्ले यांना संपर्क केला होता. त्यांनी आव्हान स्विकारने आणि बोगदा वर्ष 1931 मध्ये कोलकाता येथील पाण्याखाली तयार करण्यात आला.

आणखी वाचा : 

चीनमधून कराचीला जाणाऱ्या जहाजात संशयास्पद उपकरणे आढळले, डीआरडीओने केला खुलासा

उत्तर प्रदेशमध्ये योगी मंत्रिमंडळात 4 नवीन मंत्र्यांचा समावेश, ओम प्रकाश राजभर, दारा सिंह चौहान, अनिल कुमार, भाजप आमदार सुनील शर्मा यांनी घेतली शपथ

Lok Sabha Election 2024 : येत्या 14-15 मार्चला लोकसभा निवडणुकीच्या ताराखा जाहीर होण्याची शक्यता, सात टप्प्यात मतदान होणार?

Share this article