Russia-Ukraine मधील संघर्षाची स्थिती सुधारण्यासाठी PM मोदींचे प्रयत्न

गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला पूर्णविराम मिळत नाही आहे. अशातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाच्या स्थितीमध्ये संतलुन राखण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला जात आहे.

PM Modi on Russia-Ukraine War :  रशिया आणि युक्रेनमदील संघर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची कुटनितीचा वापर करत भारताला एक महत्वपूर्ण जागतिक स्तरावर नेले आहे. गेल्या तीन दशकांपासून एखाद्या भारतीय पंतप्रधानाच्या दौऱ्यामुळे दोन विरोधी देशांमधील संतुलन कायम ठेवण्याची क्षमता दाखवून दिली आहे. याशिवाय रशिया आणि युक्रेन देशासोबतच्या संबंधांसह शांतीदूतच्या रुपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी संभाव्य असणारी भूमिका दोन्ही देशांसाठी घेतली आहे.

रशियासोबत भारताचे नातेसंबंध शीत युद्धापासूनचेच आहेत. गेल्या अनेक दशकांपासून रशियाकडून भारताला मोठा पाठिंबा दिला जात आहे. रशिया भारताला सैन्यासाठी लागणारी उपकरणे आणि तंत्रज्ञानाची मदत करते. यालट युक्रेनही सोवित संघापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संरक्षण, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एक मोठा भागीदार राहिला आहे.

जागतिक दबावादरम्यान भारताची तटस्थ भूमिका
रशिया आणि युक्रेनच्या संघर्षादरम्यान संबंध टिकवून ठेवणे भारतासाठी आव्हानात्मक राहिले आहे. अमेरिकेच्या नेतृत्वात पश्चिमी देशांनी रशियाच्या विरोधात भूमिका घेत काही देशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भारताने यामध्ये तटस्थ भूमिका साकारली. याशिवाय भारताने चर्चा आणि शांतीचा मार्ग निवडला. मोदी सरकारची वेळोवेळी रशिया आणि युक्रेनसोबत चर्चा सुरु आहे. पण दुसऱ्या बाजूला रशियाला संपवण्याच्या दबावाला भारताकडून विरोध केला जात आहे. एवढेच नव्हे काही पश्चिमी देशांनी घातलेल्या निर्बंधादरम्यान भारत आणि रशियामधील व्यापार सुरूच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन दौऱ्यावेळी भारताने शांतीचा मार्ग निवडला असून यामध्ये सर्व पक्षांनी जोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. रशिया आणि युक्रेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. यावरुन कळते की, भारताला जागतिक स्तरावर किती सन्मान मिळू शकतो.

 

 

पंतप्रधानांच्या कूटनितीवर सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया आणि युक्रेनच्या दौऱ्याला भारतात संमीश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कूटनितीचे कौतूक करत म्हटले की, पंतप्रधान मोदी वास्तवात एक जागतिक नेत आहेत. याशिवाय शांती निर्मात्याच्या रुपात भारताची स्थिती आता मजबूत झाली आहे. दुसऱ्या बाजूला टीका करणाऱ्यांकडून असे म्हटले जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे ग्राउंड स्तरावर काही फरक पडणार आहे का?

अमेरिकेतोसबतही टिकवून ठेवलेत संबंध
रशियासोबत घनिष्ठ आणि आर्थिक संबंध असले तरीही भारताला अमेरिकेसोबतही आजही उत्तम टिकवून ठेवण्यास यश आले आहे. आजच्या राजकीय वातावरणात असे संबंध टिकवून ठेवणे फार आव्हानात्मक आहे.

पापा ने वॉर रुकवा दी…
मोदी यांच्या युक्रेन दौऱ्याची चर्चा सोशल मीडियावर झालीच. पण ‘पापा ने वॉर रुकवा दी’ ची पोस्टही तुफान व्हायरल झाली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाच्या स्थितीचे ज्या पद्धतीने संतुलन राखले आहे त्याचे कौतूक केले जात आहे. काहीजण भारत आता शांतीदूत असल्याचेही काहीजणांकडून बोलले जात आहे.

आणखी वाचा : 

चंपाई सोरेन यांच्या भाजप प्रवेशाचे गूढ उलगडले? 'या' दिवशी करणार पक्षप्रवेश

महिलांवरील गुन्हे अक्षम्य आहेत, लखपती दीदी परिषदेत पीएम मोदींचे प्रतिपादन

Share this article