तब्बल 43 वर्षानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानाकडून आज कुवैत दौरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील दोन दिवस कुवैत दौरा करणार असून यासाठी अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जबर अल-सबा यांनी त्यांना निमंत्रण पाठवले होते.
PM Narendra Modi Kuwait Visit Schedule : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (21 डिसेंबर) पुढील दोन दिवस कुवैत दौऱ्यावर असणार आहेत. खरंतर, पंतप्रधानांसाठी कुवैत दौरा अत्यंत खास असल्याचे मानले जात आहे. कारण 43 वर्षानंतर पहिल्यांदा एखादा भारतीय पतंप्रधान कुवैत दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला कुवैत दौऱ्यावर असणार आहेत. कुवैतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जबर अल-सबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवैत दौऱ्यासाठी निमंत्रण पाठवले होते. याआधी भारताकडून अखेरच्या वेळेस माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वर्ष 1981 मध्ये कुवैतचा दौरा केला होता. तत्कालीन उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांनी वर्ष 2009 मध्ये पश्चिम आशियाई देशांचा दौरा केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवैतमधील भारतीय नागरिकांना भेटणार आहेत. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी कुवैतमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. कुवैतमधील भारतीय पंतप्रधानांना भेटण्यासाठी उत्साहित आहेत. कुवैतमध्ये 10 लाख भारतीय नागरिक स्थायिक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवैत दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक सुधारतील अशी चर्चा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावेळी उर्जा, हाइड्रोकार्बन आणि दोन्ही देशांमधील संबंधांसह अन्य मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कुवैतमध्ये अमीरसोबत द्विपक्षीय बैठकीत स्थानिक चलनातल्या व्यवसायावरही चर्चा होणार आहे.
आणखी वाचा :
६ लाखांच्या जिवनांशासाठी न्यायाधीशांचा पत्नीला दम-कोर्ट केस व्हायरल