गुरुवायूर मंदिरात नेते सुरेश गोपी यांच्या मुलीच्या विवाहाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लावली उपस्थिती, नवदांपत्यांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (17 जानेवारी) केरळ दौऱ्यावर आहेत. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिशूर येथील गुरुवायूर मंदिरात पूजा करण्यास दर्शनही घेतले. यानंतर पंतप्रधानांनी नेते सुरेश गोपी यांच्या मुलीच्या विवाहाला उपस्थिती लावली.

PM Narendra Modi Kerala Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळच्या दौऱ्यावर आहेत. येथे पंतप्रधानांनी सकाळी त्रिशूरमधील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिरात (Guruvayur Temple) पूजा करण्यासह दर्शन घेतले. यादरम्यान पंतप्रधान मंदिरातीलच कल्याण मंडपात पोहोचत अभिनेता ते नेते झालेल्या सुरेश गोपी (Suresh Gopi) यांची मुलगी भाग्या सुरेशच्या (Bhagya Suresh) विवाहासाठी पोहोचले. यावेळी पंतप्रधानांनी नवदांपत्यांना विवाहाच्या शुभेच्छाही दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवायूर मंदिर परिसरात काही वेळ व्यथित केला आणि त्यानंतर केरळातील त्रिरिप्रायर श्री रामास्वामी मंदिरात (Thriprayar Temple) दर्शनासाठी पोहोचले. केरळातील पारंपारिक पोशाख परिधान करत पंतप्रधानांनी मंदिरात कमळाच्या फुलांच्या पाकळ्यांनी थुलाभरम विधी केला आणि आध्यात्मिक कार्यातही वेळ व्यथित केला.

भाग्य सुरेश हीचे पती मवेलिककारा येथील व्यावसायिक आहे. श्रेयस मोहन असे त्यांचे नाव आहे. जुलै (2023) महिन्यात भाग्य सुरेश आणि श्रेयस मोहन यांचा साखरपुडा झाला होता.आज भाग्या सुरेश आणि श्रेयस यांच्या लग्नसोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही मान्यवरांनी उपस्थितीत लावली होती.

या योजनांचा करणार शुभारंभ
केरळच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काही महत्त्वाच्या प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. पंतप्रधान 4 हजार कोटी रूपयांच्या योजनांची सुरुवात करणार आहेत. यामध्ये कोचीन डॉकयार्डवर न्यू ड्राय डॉक, इंटरनॅशनल शिप रिपेअर फॅसिलिटीसह इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या एलपीजी इंपोर्ट टर्मिनलचेही उद्घाटन करणार आहेत.

केरळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो
केरळात पोचोहल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केपीसीसी जंक्शन ते एर्नाकुलम (Ernakulam) गेस्ट हाउसपर्यंत रोड शो केला. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री थांबले होते. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजप पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक फुलांचे हार घेऊन पोहोचले होतो. रोड शो दरम्यान पंतप्रधानांसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन देखील होते.

आणखी वाचा : 

नाशिकमधील रोड शो ते काळाराम मंदिरापर्यंत, पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास PHOTO

Kalaram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिराचे घेतले दर्शन, प्रभू श्री रामाच्या भक्तीत झाले तल्लीन

Yuva Mahotsav : युवा दिनानिमित्त नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये तरुणांना दिला हा मोलाचा सल्ला, वाचा पंतप्रधानांच्या संभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Share this article