नरेंद्र मोदींचा कॅप्टन स्मित माछर यांना फोन

नरेंद्र मोदींचा कॅप्टन स्मित माछर यांना फोन

Published : Oct 02, 2026, 06:02 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Flydubai चे कॅप्टन स्मित माछर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. गंभीर जखमी असतानाही प्रसंगावधान आणि धैर्य दाखवत प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मोदींनी कौतुक केले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. कॅप्टन माछर यांनी विमानातील घटनेचा थरार सांगताना कठीण प्रसंगी हनुमान चालीसा म्हणत असल्याचे सांगितले. मोदींनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असल्याचे म्हटले.