पीएम मोदी निवृत्त कधी होणार?, भाजपच्या दिग्गज नेत्याने सांगितला फिक्स टाइम

Published : Aug 22, 2024, 01:38 PM ISTUpdated : Aug 22, 2024, 01:41 PM IST
Case filed against PM Modi

सार

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानंतर राजीनाम्याचा दावा केला आहे. स्वामी म्हणाले की, आरएसएसच्या नियमानुसार 75 वर्षांनंतर मोदींना निवृत्ती घ्यावी लागेल.

नवी दिल्ली: भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी आता आणखी एक स्फोटक विधान करून चर्चेत आले आहेत. आता त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत वक्तव्य केलं आहे. मात्र, त्यांनी यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवर टीका करून भाजप सरकारसमोर अडचणी निर्माण केल्या आहेत.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवर लिहिले आहे - पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात 17 सप्टेंबर रोजी त्यांचा 74 वा वाढदिवस साजरा करतील. RSS च्या अलिखित नियमानुसार ते त्यांच्या 75 व्या वाढदिवसाला निवृत्त होतील. जर ते निवृत्त झाले नाहीत तर आरएसएस सुकाणू समिती इतर मार्गाने त्यांची निवृत्ती जाहीर करेल.

 

 

एकूणच, सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी यांचा 75 वा वाढदिवस साजरा करून राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले आहे. याआधीही त्यांनी पंतप्रधान मोदींवर अनेकदा टीका केली होती.

मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते वयाची 75 वर्षे ओलांडून सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले आहेत. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांसारखे दिग्गज 'मार्गदर्शक मंडळा'त सामील झाले. सुमित्रा महाजन यांच्यासारख्या बड्या नेत्यालाही निवडणूक लढवता आली नाही. आता पंतप्रधान मोदी 75 वर्षांचे होणार असून ते राजकारणातूनही निवृत्त होणार आहेत, त्यामुळे ते पंतप्रधानपदावरून पायउतार होणार आहेत.

आणखी वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोलंडमध्ये चक्क मराठीतून भाषण, पाहा VIDEO

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Lionel Messi India Visit : 14 वर्षांनंतर लिओनेल मेस्सी भारतात दाखल, ‘GOAT इंडिया टूर 2025’ला भव्य सुरुवात
मेस्सी-मेस्सीच्या घोषणांनी दुमदुमले कोलकाता, रात्री उशिरा पोहोचला GOAT