नायजेरिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तेथील सरकारने त्यांच्या देशाचा दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' प्रदान करून सन्मानित केले आहे.
नायजेरिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तेथील सरकारने त्यांच्या देशाचा दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' प्रदान करून सन्मानित केले आहे.
तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले मोदी पहिल्या टप्प्यात नायजेरियाचे पंतप्रधान बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून नायजेरियाला आले आहेत. १७ वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान नायजेरिया दौऱ्यावर आले असून, तेथील सरकारने प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मोदी म्हणाले की, 'हा १४० कोटी भारतीयांना मिळालेला सन्मान आहे'.
यापूर्वी १९६९ मध्ये राणी एलिझाबेथ यांना हा सन्मान मिळाला होता. त्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे मोदी दुसरे परदेशी व्यक्ती ठाले आहेत. हा पंतप्रधानांना मिळालेला १७ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
नायजेरियाच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा:
'नायजेरियासोबतच्या धोरणात्मक भागीदारीला भारत सर्वोच्च प्राधान्य देतो. तसेच नायजेरियासोबत संरक्षण, व्यापारसह सर्व क्षेत्रांमध्ये संबंध वाढवण्यासाठी पावले उचलू' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
रविवारी नायजेरिया दौऱ्यादरम्यान अध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करताना मोदी म्हणाले की, 'दहशतवाद, फुटीरतावाद, चोरी, अंमली पदार्थांची तस्करी ही आपल्यासमोरील मोठी आव्हाने आहेत आणि दोन्ही देशे या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकत्र काम करतील'.
तसेच नायजेरियातील ६०,००० भारतीय समुदाय दोन्ही देशांमधील संबंधात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे मोदींनी सांगितले. भारतीयांच्या विकासाची खात्री करत असल्याबद्दल त्यांनी टिनुबू यांचे आभार मानले. यावेळी पूरग्रस्त नायजेरियाला २० टन मदत सामग्री देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.