
नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पूर्णपणे तामिळनाडूवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यांनी पुढच्या ११ दिवसांत तब्बल तीन वेळा तामिळनाडू दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यांची सुरुवात १ मार्च रोजी मदुराई येथील एनडीएच्या जाहीर सभेने होईल. या भेटीदरम्यान ते तिरुपरनकुंद्रम मंदिरात दर्शन घेण्याची आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचं उद्घाटन करण्याची शक्यता आहे.
यानंतर, ७ मार्चला वेल्लोर आणि ११ मार्चला तिरुचिरापल्ली येथे होणाऱ्या सभांनाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुकीचं वातावरण आणखी तापणार आहे. तामिळनाडूमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.