Namo Bharat : देशातील सर्वात वेगवान मेट्रो धावली, पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्राला समर्पित

Published : Feb 23, 2026, 07:33 AM IST
PM Modi Inaugurates Indias Fastest Metro

सार

PM Modi Inaugurates Indias Fastest Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी देशातील सर्वात वेगवान मेट्रो आणि 'नमो भारत' रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमचं उद्घाटन केलं. एकाच रुळावर मेट्रो आणि रॅपिड रेल धावण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

PM Modi Inaugurates Indias Fastest Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील सर्वात वेगवान मेट्रो आणि 'नमो भारत' रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (RRTS) देशाला समर्पित केली. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे, देशात पहिल्यांदाच एकाच रेल्वे ट्रॅकवर मेट्रो आणि रॅपिड रेल धावणार आहेत. उद्घाटनानंतर मोदींनी स्वतः मेट्रोने प्रवास केला आणि विद्यार्थी व अधिकाऱ्यांशी गप्पा मारल्या.

यासोबतच, मोदींनी १२,९३० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभही केला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, "आज उद्घाटन झालेले प्रकल्प 'विकसित उत्तर प्रदेश' आणि 'विकसित भारता'ला आणखी बळ देतील. हे प्रकल्प भाजपच्या डबल इंजिन सरकारची कार्यसंस्कृती दाखवतात. आमचं सरकार कोणतीही योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे."

ताशी 120 किमी वेगाने धावणारी मेट्रो:

मेरठ मेट्रो २३ किलोमीटर लांबीची असून, ती ताशी १२० किलोमीटर वेगाने धावेल. यामुळे ही देशातील सर्वात वेगवान मेट्रो ठरली आहे. ही ट्रेन दक्षिण मेरठ आणि मोदीपुरम दरम्यान धावणार आहे.

'नमो भारत' रॅपिड रेल:

'नमो भारत' कॉरिडॉर हा दिल्ली-गाझियाबाद-मेरठला जोडणारा देशातील पहिला रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम आहे. या प्रणालीतील काही मार्ग आधीच सुरू झाले होते. आता दिल्लीतील सराय काले खान ते न्यू अशोक नगर (५ किमी) आणि उत्तर प्रदेशातील दक्षिण मेरठ ते मोदीपुरम (२१ किमी) या उर्वरित मार्गांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यामुळे दिल्ली आणि मेरठमधील संपूर्ण ८२ किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर आता कार्यान्वित झाला आहे. ताशी १८० किलोमीटर वेगाने धावणारी ही 'नमो भारत' रॅपिड रेल दिल्लीला साहिबाबाद, गाझियाबाद, मोदीनगर आणि मेरठ यांसारख्या प्रमुख शहरांशी जोडेल.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

SBI Viral Video: बँकेत पैसे भरण्यावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यात राडा, व्हिडिओ व्हायरल
Sonia Gandhi Love Story : सोनिया आणि राजीव गांधींची लव्हस्टोरी कुठे सुरू झाली? सोनिया गांधींनीच सांगितला किस्सा