दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशात घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला

Published : Feb 23, 2026, 07:27 AM IST
Delhi Police Busts Terror Module Linked to Pakistan and Bangladesh

सार

Delhi Police Busts Terror Module Linked to Pakistan and Bangladesh : दिल्ली पोलिसांनी एक मोठी दहशतवादी कारवाई उधळून लावली आहे. देशभरात हल्ले करण्याची योजना आखणाऱ्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

Delhi Police Busts Terror Module Linked to Pakistan and Bangladesh : देशभरात घातपात घडवण्याचा कट रचणाऱ्या ८ संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये ७ जण बेकायदेशीररित्या भारतात घुसलेले बांगलादेशी नागरिक आहेत. या कारवाईमुळे पोलिसांनी एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला असून, देशावरील संकट टळलं आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांचे संबंध बांगलादेश आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) सोबत, तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी अटक केलेल्यांकडून ८ मोबाईल फोन आणि १६ सिमकार्ड जप्त केले आहेत. या फोनच्या प्राथमिक तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशयितांनी हल्ला करण्याच्या ठिकाणांची पाहणी केली होती आणि हल्ल्यासाठी शस्त्रे खरेदी करण्याची योजना आखली होती. दिल्लीतील लाल किल्ला आणि काही मंदिरांवर हल्ला करण्याचा कट पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने रचला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यानंतर लगेचच ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या जाळ्यात कसे अडकले?

७ फेब्रुवारी रोजी दिल्ली आणि कोलकाता येथील मेट्रो स्टेशनजवळ देशविरोधी पोस्टर लावण्यात आले होते. त्यावर 'फ्री काश्मीर' आणि 'काश्मीरमधील हत्याकांड थांबवा' असे लिहिले होते. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पश्चिम बंगालमधून उमर फारूख आणि राबील उल इस्लाम या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून आणखी ६ संशयित दहशतवाद्यांना अटक केली. हे सर्वजण बनावट आधार कार्ड वापरून एका स्थानिक गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करत होते. अटक केलेल्यांची नावे मिजनौर रहमान, मोहम्मद शबात, उमर मोहम्मद लिटन, मोहम्मद शाहीद आणि मोहम्मद उज्ज्वल अशी आहेत.

हे सर्वजण बांगलादेशातून सूत्रं हलवणाऱ्या शब्बीर अहमद नावाच्या व्यक्तीच्या इशाऱ्यावर काम करत होते. शब्बीर अहमद हा एका बॉम्बस्फोट प्रकरणात भारतात तुरुंगवासाची शिक्षा भोगून सुटला होता. सुटकेनंतर तो बांगलादेशला पळून गेला आणि तिथे त्याने लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या मदतीने दहशतवादी कारवाया सुरू केल्या होत्या.

हल्ल्याचा संशय:

६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील एका मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात ३२ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचा खोटा आरोप पाकिस्तानने केला होता. याच घटनेचा बदला घेण्यासाठी लष्करचे दहशतवादी दिल्लीतील लाल किल्ला आणि काही मंदिरांवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती.

असा लागला दहशतवाद्यांचा माग

१. ७ फेब्रुवारीला दिल्ली आणि कोलकाता मेट्रो स्टेशनवर काश्मीरविरोधी पोस्टर लागले.
२. दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला. बंगालमध्ये दोघांना अटक, त्यांच्या चौकशीतून तामिळनाडूचा सुगावा लागला.
३. तिरुपूरमधील गारमेंट फॅक्टरीतून ६ जणांना अटक, त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड जप्त.
४. या सर्वांचा मास्टरमाइंड शब्बीर बांगलादेशातून सूत्रं हलवत होता. त्याचे लष्कर आणि हाफिज सईदशी संबंध उघड.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा, देशातील सर्वात वेगवान मेट्रो धावली!
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल