उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

भारतीय शास्त्रीय संगीतात क्रांती घडवणारे व्यक्तिमत्व म्हणून पंतप्रधान मोदींनी उस्ताद हुसेन यांचे वर्णन केले. ट्विटरद्वारे त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

दिल्ली : प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात क्रांती घडवणारे व्यक्तिमत्व म्हणून पंतप्रधान मोदींनी उस्ताद हुसेन यांचे वर्णन केले. ट्विटरद्वारे त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

"दिग्गज तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन जी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगतात क्रांती घडवणारे एक खरे प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांची आठवण राहील. त्यांच्या अतुलनीय तालबद्धतेने लाखो संगीत रसिकांना आणि तबल्याला जागतिक स्तरावर नेले. यामुळे त्यांनी भारतीय शास्त्रीय परंपरेला जागतिक संगीताशी जोडले आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक बनले.

"त्यांचे वेगळे सादरीकरण आणि मनापासून केलेल्या रचना संगीतकार आणि संगीतप्रेमींच्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. त्यांच्या कुटुंबियांसोबत, मित्रांना आणि जागतिक संगीत समुदायाला माझी हार्दिक संवेदना", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांची एक्स पोस्ट :

हृदय आणि श्वसनविकाराच्या आजाराने अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना झाकीर हुसेन यांचे निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

Share this article