PM Dhan Dhanya Krishi Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर!, 'धन-धान्य' योजनेला कॅबिनेटची मंजुरी

Published : Jul 16, 2025, 05:59 PM IST
PM Dhan Dhanya Krishi Yojana

सार

PM Dhan Dhanya Krishi Yojana : केंद्रीय कॅबिनेटने 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना' मंजूर केली आहे. या योजनेचा लाभ 1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार असून, शेती अवजारे, बी-बियाणे, खते खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आली आहे. अर्थसंकल्प 2024 मध्ये जाहीर झालेली ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’ आता अधिकृतपणे केंद्रीय कॅबिनेटने मंजूर केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ तब्बल 1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे:

36 कृषी योजना एकत्र करून, या माध्यमातून शेतकऱ्यांना एकसंध लाभ मिळवून देण्याचा सरकारचा उद्देश आहे.

2005 पासून पुढील 6 वर्षांसाठी ही योजना राबवली जाणार आहे.

यासाठी दरवर्षी 24,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, देशातील 100 निवडक जिल्ह्यांमध्ये ही योजना प्रथम अंमलात आणली जाईल.

शेतकऱ्यांना काय लाभ होणार?

शेती अवजारे, बी-बियाणे, खते खरेदीसाठी आर्थिक मदत

सिंचन सुविधा व पाण्याच्या कार्यक्षमतेत सुधारणा

कापणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी साठवणूक सुविधा

ट्रॅक्टर, कृषी पंप, आधुनिक यंत्रांसाठी अनुदान

महिला शेतकऱ्यांना विशेष प्रोत्साहन

कृषी क्षेत्रासाठी Game Changer योजना

केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की, या योजनेच्या माध्यमातून केवळ उत्पादनवाढच नव्हे, तर ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. अल्प व दीर्घकालीन कर्ज, हवामान-प्रतिरोधक शेती, आणि अचूक शेती तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिलं जाईल.

मुख्य ठळक मुद्दे:

मुद्दा         तपशील

उद्दिष्ट   100 जिल्ह्यांमधील कृषी विकास व उत्पादकता वाढवणे

लाभार्थी  1.7 कोटी शेतकरी

योजनेचा कालावधी  2005 पासून पुढील 6 वर्षे

प्रमुख घटक  सिंचन, साठवणूक, आधुनिक यंत्रसामग्री, बी-बियाणे

महिला सशक्तीकरण  महिला शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान व प्रशिक्षण

‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’ ही केवळ एक आर्थिक योजना नसून, भारतीय कृषी क्षेत्राला बळकटी देणारी दिशा ठरू शकते. कॅबिनेटची मंजुरी ही केवळ सुरुवात आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि राज्य सरकारांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!