Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल प्रत्यदर्शींने NIA ला दिली मोठी अपडेट, दहशदतवाद्यांनी आनंदात हवेत चार राउंड केले फायरिंग

Published : Jul 16, 2025, 09:46 AM ISTUpdated : Jul 16, 2025, 10:03 AM IST
Pahalgam Terror Attack

सार

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. अशातच आता NIA ला प्रत्यदर्शींने एक मोठी अपडेट दिली आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आनंदात फायरिंग केली होती.

जम्मू- काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. याच हल्ल्यातील एका प्रत्यक्षदर्शीने NIA ला एक मोठी अपडेट दिली आहे. यानुसार, दहशतवाद्यांनी हल्ल्यानंतर तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आनंदात हवेत चार राउंड फायरिंग केल्याचे सांगितले आहे.

साक्षीदाराला 'स्टार प्रोटेक्टेड विटनेस'चा दर्जा

तपास यंत्रणेने या स्थानिक प्रत्यक्षदर्शीला स्टार प्रोटेक्टेड विटनेस घोषित केले आहे. NIA ला जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय गुप्त एजेंसीना मदत करण्यासाठी साक्षीदार मिळाला आहे. हा व्यक्ती हल्ल्यानंतर घटनास्थळी होता आणि त्याने दहशतवाद्यांना पाहिले होते.

एका तपास अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेस यांच्यासोबत बोलताना सांगितले की, "दहशतवाद्यांनी त्या व्यक्तीला रोखले आणि कलमा बोलण्यास सांगितले. त्याने स्थानिक कश्मीरी पद्धतीने कलमा बोलून दाखवला. यामुळे दहशतवाद्यांनी त्याला काही केले नाही. यानंतर लगेच दहशतवाद्यांनी हवेत चार राउंड फायरिंग केले." साक्षीदाराच्या साक्षीच्या आधारावर NIA कडून घटनास्थळावरुन चार रिकामी काडतूसे देखील जप्त करण्यात आली आहेत.

साक्षीदाराने असे देखील सांगितले की, त्याने परवेज अहमद जोठार आणि बशीर अहमद नावाच्या दोन स्थानिक लोकांनी डोंगराळ भागात दहशतवाद्यांचे सामान सांभाळताना पाहिले होते. यानंतर काही वेळानंतर दहशतवादी सामान घेऊन निघाले. तपासात खुलासा झाला आहे की, परवेज आणि बशीरला दहशतवाद्यांची मदत करण्याच्या आरोपाखाली आधीच अटक करण्यात आली आहे.

असे केले हल्ल्याचे प्लॅनिंग

सूत्रांनुसार, 21 एप्रिलला दुपारी 3.30 वाजता पाकिस्तानी दहशतवादी परवेज याच्या घरी पोहोचले होते. येथे दहशतवाद्यांनी चार तास परिसराची रेकी केली. यावेळी सुरक्षा व्यवस्था, टुरिस्ट स्पॉट आणि मार्गांची माहिती घेतली. घरातून बाहेर पडताना दहशतवाद्यांनी परवेजच्या पत्नीकडून मसाले आणि भात भरुन घेत तिला 500 रुपये दिले. यानंतर बशीरला भेटले आणि 22 एप्रिलला दुपारी 12.30 वाजता तयार राहण्यास सांगितले.

सुलेमान शाहच्या भूमिकेवर संशय

NIA ला असा संशय आहे की, या हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तैयबासंबंधित दहशतवादी सुलेमान शाहची भूमिका असू शकतो. जो याआधी एका भोगद्याच्या प्रोजेक्टमद्ये काम करत असलेल्या 7 मजूरांच्या हत्याकांडात सहभागी होता. दरम्यान, आता NIA कडून तपासाला वेग आला आहे. याशिवाय स्थानिक मदतगार आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा या प्रकरणाशी कोणती लिंक मिळतेय का याचा देखील अधिक तपास केला जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!
इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!