
मुंबई : राजधानी पटना येथील परसा बाजारा थाना क्षेत्राच्या सुईथा मोडजवळ बुधवारी रात्री उशिरा पटना-गया फोरलेनवर एक मोठा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे पाच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला आहे. घटनेवेळी भरधाव वेगाने आलेल्या कारची ट्रकला धडक बसली. यामुळे कारमधील पाच तरुण व्यावसायिकांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत व्यक्ती पटनामधील कुर्जी, गोपालपुर आणि पटेल नगरसह समस्तीपुर परिसरात राहणारे असल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेत कारमधील मृतदेह काढले.
नक्की काय घडले?
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कार पटनाच्या दिशेने जात होती. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने ट्रकला मागच्या बाजूने जोरात धडक दिल्याने अपघात झाला. ही धडक ऐवढी भयावय होती की, कारचे बोनेट पूर्णपणे ट्रकमध्ये घुसले गेले. यानंतर ट्रकने कारला जवळजवळ 50 मीटरपर्यंत फरफटत नेले आणि पुढे जाऊन जोरात स्फोट झाल्याचा आवाज आला. यामुळे परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
अपघातात कारचे मोठे नुकसान
अपघाताची बातमी कळताच परसा बाजार थाना पोलीस आणि पटनाचे डीएसपी रंजन कुमार घटनास्थळी पोहोचले. कारचे फार मोठे नुकसान झाले होते. याशिवाय मृतदेह कारमध्ये अडकले गेले होते. एवढेच नव्हे घटनास्थळी नागरिकांची गर्दी देखील झाली होती. पोलिसांनी कारमधील मृतदेह काढण्यासाठी त्यांना कारचे पत्रे कापले.
मृतांची ओखळ पटली
अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणांची ओखळ पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये राजेश कुमार मितन छपरा, गोपालपुर थाना क्षेत्रातील कमल किशोर, सुनील कुमार, प्रकाश चौरसिया आणि कारचा मालक संजय कुमार सिन्हा, जो पटेल नगर गांधी मूर्तीजवळ राहणारा होता.
भरधाव वेगाने आलेली कार ठरली अपघाताचे कारण
प्रत्यक्षदर्शी आणि डीएसपी रंजन कुमार यांनी सांगितले की, कारचा वेग अधिक होता. यामुळेच कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकला धडक बसली. यावेळी ट्रक चालकाने ट्रक थांबवण्याएवजी तो कारला फरफटत पुढे घेऊन गेला. यामुळेच भीषण अपघात झाला. सदर घटनेतील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून त्यानंतर परिवारांना दिले जाणार आहेत.