Patanjali Ads Case : बाबा रामदेव यांची संस्था पंतजली आयुर्वेदने सुप्रीम कोर्टात 23 एप्रिलला होणाऱ्या सुनावणीआधी एक सार्वजनिक माफीनामा जाहीर केला होता. यावरूनच सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांना बाळकृष्ण यांना फटकारले होते.
Patanjali Ads Case : पंतजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांनी बुधवारी (24 एप्रिल) पुन्हा एकदा वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहीर माफी मागितली आहे. सुप्रीम कोर्टाने याआधी पंतजली आयुर्वेदने वृत्तपत्रात छापलेल्या माफीनाम्याच्या आकारावरून प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. वृत्तपत्रातील माफीनाम्यात म्हटलेय की, देशातील सुप्रीम कोर्टात सुरू असलेले प्रकरण लक्षात घेता आम्ही व्यक्तीगत आणि कंपनीच्या वतीने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन न करण्यासाठी माफी मागत आहोत."
नक्की काय म्हटलेय माफीनाम्यात?
माफीनाम्यात असेही म्हटले आहे की, "आम्ही 22/11/2023 रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेबद्दल माफी मागत आहोत. आम्ही आमच्या जाहिरातींवरुन झालेल्या चुकीबद्दल माफी मागतोय. अशी चूक आता पुन्हा होणार नाही. आम्ही सावधगिरीने आणि इमानदारीने कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्याचे वचन देतो. आम्ही कोर्टाची प्रतिष्ठा कायम ठेवण्यालह संबंधित अधिकाऱ्यांनी लागू केलेले कायदे आणि निर्देशांचे पालन करण्याचे वचन देतो."
माफीनामा ऑन रेकॉर्ड ठेवा- सुप्रीम कोर्ट
बाबा रामदेव आणि पंतजली आयुर्वेद लिमिटेडचे बाळकृष्ण यांनी न्यायाधीश हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुहल्लाह यांच्या खंडपीठाला सांगितले की, आम्ही दिशाभूल जाहिरातींवरून 67 वृत्तपत्रांच्या माध्यमातून माफी मागितली आहे. यावर न्यायाधीश हिमा कोहली यांनी म्हटले की, "तुम्ही जाहिरातीच्या ज्या आकारामध्ये करायचे त्याच आकारामध्ये माफीनामा होता का? या जाहिरातींची कात्रणे घ्या आणि आम्हाला पाठवा. याला मोठे करण्याची गरज नाही. आम्हाला जाहिरातींचा आकार आहे तो पाहायचा आहे. हे आमचे निर्देश आहेत."
पुढे हिमा कोहली यांनी म्हटले की, ज्यावेळी तुम्ही एखादी जाहिरात प्रकाशित करता याचा अर्थ असा होत नाहीकी, आम्ही ती भिंगाच्या माध्यमातून पाहू. जाहिरात केवळ पानांवर नकोय, ती वाचता देखील आली पाहिजे. कोर्टाने बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना असेही निर्देश दिलेत की, माफीनामा ऑन रेकॉर्ड असावा. यामध्ये आम्ही चूक केलीय असेही असू द्या.
आणखी वाचा :
मुकेश दलाल झाले बिनविरोध खासदार, त्यांच्या विजयामागे कोणाचा हात