रेल्वे कुली की 'कुली नंबर वन'?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एक व्हिडिओमध्ये रेल्वेचा एक कुली प्रवाशांना खिडकीतून ट्रेनमध्ये चढवताना दिसत आहे. ट्रेनमधील गर्दी आणि प्रवाशांना होणारा त्रास यावरून अनेकांनी टीका केली आहे.

भारतीय रेल्वेशी संबंधित अनेक बातम्या आपण पाहतो. भारतातील अनेक शहरांमध्ये ट्रेन प्रवास हा त्रासदायक आहे. वाढती लोकसंख्या हे त्याचे मुख्य कारण आहे. त्यानुसार सुविधा नसल्याने प्रवाशांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. बहुतेक ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते. स्लीपर कोचमध्येही लोक ठासून भरलेले असतात. आपल्याला जायचे असलेल्या ट्रेनमध्ये जागा मिळत नाही असेही होते. 

भारतातील ट्रेनमधील गर्दी दाखवणारे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. ट्रेनमध्ये चढण्यासाठी लोक धडपडतात, भांडण करतात असे व्हिडिओही पाहिले असतील. मात्र, त्या सर्वांपेक्षा वेगळा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक लोक या व्हिडिओवर टीका करत आहेत. 

व्हिडिओमध्ये रेल्वेचा एक कुली लोकांना खिडकीतून ट्रेनमध्ये चढवताना दिसत आहे. हो, विश्वास बसणार नाही पण ही घटना खरी आहे. व्हिडिओमध्ये गर्दीची ट्रेन दिसत आहे. लोक त्यात चढण्याचा प्रयत्न करत आहेत. तेवढ्यात एक व्यक्ती लोकांना खिडकीतून ट्रेनमध्ये चढवतो. त्यांच्या बॅगाही आत टाकताना दिसत आहे. एकामागून एक असे तो लोकांना खिडकीतून ट्रेनमध्ये चढवतो. 

'कुली नंबर वन' अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ एक्स (ट्विटर) वर शेअर करण्यात आला आहे. काहींना तो विनोद वाटला, तर काहींनी त्यावर टीका केली. 'हा काय कुली नंबर वन आहे का?' असा त्यांचा प्रश्न होता. 'ही घटना भारतीय रेल्वेला लाजिरवाणी आहे' असे मत अनेकांनी व्यक्त केले. 

'भारतातील प्रवाशांच्या त्रासदायक ट्रेन प्रवासाला अजूनही अंत नाही हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे' अशीही अनेकांनी प्रतिक्रिया दिली. 

Share this article