Indian Railways: कन्फर्म तिकीट असूनही प्रवाशाला सीटच मिळाली नाही; कोचमध्ये ५२ तर तिकीटावर ५४ नंबर

vivek panmand   | CMS
Published : Nov 25, 2026, 03:59 PM IST
Man Gets Seat No. 54 Ticket, Finds Coach Has Only 52 Berths

सार

रात्रीच्या प्रवासात एका प्रवाशाला आलेला निराशाजनक अनुभव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेमुळे रेल्वे व्यवस्थापन आणि तिकीट वाटपातील अचूकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रात्रीच्या प्रवासात एका प्रवाशाला आलेला निराशाजनक अनुभव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेमुळे रेल्वे व्यवस्थापन आणि तिकीट वाटपातील अचूकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ईशान बाजपेयी यांनी X वर त्यांचा अनुभव शेअर केला. ते ट्रेन नंबर १५१३२ ने प्रवास करत होते. त्यांच्या कन्फर्म तिकीटावर बर्थ नंबर A1/54 नमूद होता. पण जेव्हा ते कोचमध्ये गेले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कारण त्या कोचमध्ये फक्त ५२ बर्थ होते. त्यामुळे त्यांना आपली अलॉट केलेली सीट कुठेच सापडली नाही.

ही घटना रात्री साधारण १०.४५ च्या सुमारास घडली.

"रात्री १०.४५ ला कन्फर्म तिकीट असतानाही तुम्हाला तुमची सीट मिळत नाही, हा अनुभव खूप त्रासदायक आहे. मी १३९ वर तक्रार नोंदवली आहे. असं कसं होऊ शकतं?" असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं.

बाजपेयी यांच्या या पोस्टला जोरदार प्रतिसाद मिळाला आणि जवळपास तीन लाख लोकांनी ती पाहिली. अनेकांनी प्रश्न विचारला की, कोचमध्ये जे बर्थ अस्तित्वातच नाही, ते रेल्वेच्या रिझर्व्हेशन सिस्टीमने कन्फर्म कसं केलं?

रेल्वे सेवेकडून प्रवाशाच्या तक्रारीची दखल

या घटनेची दखल रेल्वे मंत्रालय चालवत असलेल्या 'रेल्वे सेवा' या अधिकृत पॅसेंजर-सपोर्ट अकाऊंटने घेतली.

बाजपेयी यांच्या तक्रारीवर उत्तर देताना त्यांनी खेद व्यक्त केला आणि पुढील कारवाईसाठी ही बाब संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवल्याचं सांगितलं.

"तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल आम्हाला खेद आहे. कृपया तुमचा मोबाईल नंबर शक्यतो DM द्वारे शेअर करा, जेणेकरून आम्ही तत्काळ कारवाई करू शकू. तुम्ही थेट railmadad.indianrailways.gov.in वरही तक्रार नोंदवू शकता किंवा त्वरित निवारणासाठी १३९ डायल करू शकता," असं त्यांच्या उत्तरात म्हटलं आहे.

त्यानंतर 'रेल्वे सेवा'ने पुष्टी केली की ही तक्रार डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (DRM), वाराणसी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर युजर्सनी कन्फर्म तिकीट आणि कोचमधील सीट्सच्या या गोंधळावरून रेल्वेला चांगलंच धारेवर धरलं.

एका युजरने गमतीत विचारलं, "तुम्ही बर्थ नंबर टॉयलेटमध्ये किंवा वरती कुठेतरी चेक केला का? रेल्वेने गरजेपेक्षा जास्त सेवा दिल्याचे दिसतेय. १०० टक्क्यांपेक्षा जास्त बर्थ नंबर. स्टुपिड सॉफ्टवेअर!"

दुसऱ्या एका युजरने रेल्वेच्या उत्तराची खिल्ली उडवत म्हटलं, "सॉरी. रेल्वेला खेद आहे आणि खूप खेद आहे आणि या गैरसोयीबद्दल अत्यंत खेद आहे. ते बुलेट ट्रेन बनवण्यात व्यस्त आहेत."

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Pushkar Fair Buffalo : पुष्कर मेळाव्यात १ कोटींची 'पिंकी'; फक्त २ फूट उंचीची ही म्हैस ठरली आकर्षण
Jennifer Barreto : जेनिफर बॅरेटोने जिंकला 'मिस युनिव्हर्स 2026'चा मुकुट