Paris Olympic 2024 : पहिल्यांदाच पदक विजेत्यांवर होणार पैशांचा पाऊस, सुवर्णपदक जिंकल्यास मिळणार लाखोंचे बक्षीस

Published : May 07, 2024, 05:20 PM IST
Paris-Olympic-prize-money

सार

Paris Olympics 2024 prize money: जागतिक ऍथलेटिक्सच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्यांना पदकांच्या व्यतिरिक्त बक्षीस रक्कम देखील दिली जाईल आणि हे यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमधून होणार आहे.

स्पोर्ट्स डेस्कः यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस येथे होत असून 26 जुलैपासून सुरू होत आहे. तर शेवट 11 ऑगस्ट रोजी आहे चालणार आहे. या मेगा स्पोर्ट्स स्पर्धेत 10500 हून अधिक ॲथलेटिक्स सहभागी होणार आहे. 48 खेळांमध्ये 329 स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. पण यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये असं काही घडणार आहे, जे जागतिक ॲथलेटिक्सच्या इतिहासात आजपर्यंत घडलं नाही.आतापर्यंत ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके दिली जात होती. मात्र यावेळी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होणार आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्यांना किती रक्कम दिली जाणार आहे हे जाणून घ्या .

सुवर्णपदक विजेत्याला ४१.६ लाख रुपये मिळणार :

जागतिक ऍथलेटिक्सच्या अहवालानुसार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 48 ट्रॅक आणि फील्ड स्पर्धा होणार आहेत. यामध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या स्पर्धकाला 50000 यूएस डॉलर म्हणजेच 41.60 लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. हे केवळ पॅरिस ऑलिम्पिकपुरते मर्यादित नाही. खरेतर, 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्यांना पदकांसह बक्षीस रक्कम दिली जाईल आणि सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तिन्ही पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना बक्षीस रक्कम दिली जाईल.

भारताच्या या खेळाडूंकडून सुवर्णपदकाची आशा :

गेल्या वर्षी, भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये ट्रॅक आणि फील्डमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्येही तो सुवर्णपदक जिंकेल अशी अपेक्षा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो अभिनव बिंद्रानंतरचा दुसरा खेळाडू आहे.याशिवाय बॉक्सिंगमध्ये टोकियोमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या लोव्हलिना बोरगोहेनकडूनही यावेळी सुवर्णपदक मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानूही यावेळी सुवर्णपदकाची दावेदार मानली जात आहे. याशिवाय रवी कुमार दहिया, या खेळाडूंकडून खूप अपेक्षा आहेत.

आणखी वाचा :

Paris Olympics 2024 : भारतीय पुरुष आणि महिलांचा 4x400 मीटर रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

बजरंग पुनियावर बंदी : सॅम्पल न दिल्याने नाडाने केली कारवाई, ऑलिम्पिक पदक विजेता म्हणाला - मुदत संपलेली किट दिली

Paris Olympic 2024: 'या' भारतीय खेळाडूंनी तिरंदाजीपासून ऍथलेटिक्सपर्यंत प्रत्येक गोष्टीत पात्रता मिळवली, कोण आहेत ते खेळाडू?

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

Recommended Stories

Sonia Gandhi Memoir: सोनिया गांधींची सोशल मीडियावर एन्ट्री, शेअर केली राजीव गांधींसोबतची 'ती' खास आठवण
Birthday Cake Paratha: बापाच्या वाढदिवसाला पोराने बनवला 'बर्थडे केक पराठा', व्हिडिओ व्हायरल