जालन्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी पिण्याचं पाणी आणि चाऱ्याच्या नियोजनाला प्राधान्य दिल्याचं सांगितलं. गरजेनुसार गावोगावी चारा डेपो आणि पुढे चारा छावण्या सुरू केल्या जातील. छावण्यांमध्ये सीसीटीव्ही आणि जनावरांच्या जिओ टॅगिंगमुळे भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. पीक नुकसानीचे पंचनामे आणि तपासणी अंतिम टप्प्यात असून अहवाल केंद्राला पाठवला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी समुपदेशन आणि गावं दत्तक घेण्याचं नियोजनही त्यांनी सांगितलं. ₹5000 ची दिवाळी मदत ही अंतिम मदत नसून पीक नुकसानभरपाई, विमा आणि केंद्राची मदत वेगळी असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. ₹10000 मदतीच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे संकेत दिले.