२२ एप्रिल २०२५, मंगळवार. ही तीच काळी तारीख आहे, जेव्हा पर्यटकांनी गजबजलेली पहलगामची बैसरन व्हॅली गोळ्यांच्या आवाजाने हादरली होती. या दहशतवादी हल्ल्याला आता एक वर्ष पूर्ण झालंय, पण २६ लोकांचा जीव घेऊन दहशतवाद्यांनी दिलेली ती जखम.
२२ एप्रिलला सुरुवातीला ५ जण जखमी झाल्याची बातमी आली, तेव्हा हा एक छोटा हल्ला वाटत होता. पण लवकरच हे एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचं भीषण वास्तव समोर आलं. भारताचं 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखली जाणारी बैसरन व्हॅली या हल्ल्याने हादरून गेली.
211
नक्की काय घडले?
पाकिस्तान-समर्थित दहशतवादी घनदाट जंगलातून बाहेर आले. त्यांनी ऑटोमॅटिक शस्त्रांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. बैसरन व्हॅलीला ७ फूट उंच कुंपण होतं आणि आत-बाहेर जायला फक्त दोन गेट होते. हल्ल्याची सुरुवात प्रवेशद्वाराजवळ झाली, जिथे त्यावेळी एकही सुरक्षा कर्मचारी नव्हता.
311
पर्यटकांवर गोळीबार
या हल्ल्यातून वाचलेल्यांनी सांगितलं की, तीन दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांपासून पुरुषांना वेगळं केलं. त्यानंतर अगदी जवळून गोळ्या झाडून ते जंगलात पळून गेले. दहशतवादी लोकांना त्यांचा धर्म विचारत होते आणि 'हिंदू' असं उत्तर मिळताच त्यांना गोळ्या घालत होते.
या हल्ल्यातला सर्वात हृदयद्रावक फोटो होता हिमांशी नरवाल यांचा. त्या आपले पती विनय नरवाल यांच्या मृतदेहाजवळ सुन्न अवस्थेत पडल्या होत्या. विनय नरवाल नौदलाचे अधिकारी होते. हिमांशी यांनी सांगितलं की, ते दोघे हनिमूनसाठी आले होते आणि भेळपुरी खात असतानाच अचानक हल्ला झाला आणि त्यांच्या पतीला गोळी लागली.
511
पत्नीची प्रतिक्रिया
पतीला गमावल्यानंतरही हिमांशी यांनी मुस्लीम किंवा काश्मिरी लोकांबद्दल द्वेष नको असल्याचं म्हटलं. त्यांना फक्त न्याय हवा आहे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असं त्या म्हणाल्या. या हल्ल्यात २६ हिंदू पुरुषांचा मृत्यू झाला, ज्यात एका नेपाळी नागरिकाचाही समावेश होता. हा या भागातील दशकातला सर्वात मोठा हल्ला ठरला.
611
पुण्यातील पर्यटकांचाही मृत्यू
पुण्याचे व्यावसायिक संतोष जगदाळे यांना इस्लामचा 'कलमा' म्हणता आला नाही, म्हणून दहशतवाद्यांनी त्यांना गोळी घातली. तर दुसरीकडे, आसामचे प्राध्यापक देबाशीष भट्टाचार्य यांनी कलमा म्हणून आपला जीव वाचवला. आजूबाजूचे लोक जे म्हणत होते, तेच मी पण म्हणालो आणि हल्लेखोराने मला सोडून दिलं, असं त्यांनी सांगितलं.
711
धार्मिक ओखळ पटवत हल्ला
तपासात असं आढळलं की, जवळपास २० मृतांची अवस्था अशी होती की त्यांची धार्मिक ओळख पटवण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, लोकांची पँट उतरवून ते मुस्लिम आहेत की नाही हे तपासण्यात आलं. अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात ही बाब समोर आली. ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स भारत दौऱ्यावर होते.
811
द रेझिस्टन्स फ्रंटने घेतली हल्ल्याची जबाबदारी
पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाशी संबंधित 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्याचा तपास NIA ने हाती घेतला. या घटनेनंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला. भारताने सिंधू पाणी वाटप करार स्थगित करण्यासारखी पावलं उचलली, तर पाकिस्ताननेही प्रत्युत्तरात शिमला करार रद्द केला.
911
ऑपरेशन सिंदूर
हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केलं. यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं. चार दिवस चाललेल्या तणावानंतर १० मे रोजी युद्धविरामाची घोषणा झाली.
1011
काश्मीर खोऱ्यातील 'ऑपरेशन महादेव'
यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात 'ऑपरेशन महादेव' सुरू केलं. गुप्त माहितीच्या आधारे दहशतवाद्यांच्या हालचालींचा माग काढण्यात आला. दहशतवादी दक्षिण काश्मीरच्या डोंगराळ भागातून दाचीगामच्या घनदाट जंगलाकडे गेले. भारतीय लष्कर, पोलीस आणि इतर यंत्रणांनी मिळून हे मोठं ऑपरेशन राबवलं.
1111
दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष
ड्रोन, सेन्सर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात आली. हळूहळू ऑपरेशनची व्याप्ती कमी करून त्यांना घेरण्यात आलं. १० जुलै २०२५ रोजी ऑपरेशन निर्णायक टप्प्यात पोहोचलं. ९३ दिवस चाललेल्या या ऑपरेशनमध्ये २५० किलोमीटर परिसराची झडती घेण्यात आली. अखेर २८ जुलै २०२५ रोजी स्पेशल फोर्सेसने तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.