जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याने हादरले

Published : Apr 23, 2025, 11:10 AM ISTUpdated : Apr 23, 2025, 12:32 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील जगदाळे आणि गनबोटे कुटुंबातील सदस्यांवर हा हल्ला झाला असून, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबियांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

PREV
16
जम्मू काश्मीरमधील पहलगम दहशतवादी हल्ल्याने हादरले

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये आज मंगळवारी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी TRF ने (द रेजिस्टन्स फ्रंट) घेतली आहे. 

26
महाराष्ट्रातील दोघांचा झाला मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्यात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झाला आहे. येथे झालेल्या स्फोटात २६ जणांचा वेदनादायी मृत्यू झाला आहे. 

36
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संपर्कात

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संपर्कात असून त्यांनी दोनही कुटुंबांना आधार दिला आहे. मुलीने आपल्या डोळ्यासमोर वडिलांना गोळ्या घातल्याचं सांगितल्यावर मन हेलावून गेलं आहे.

46
जम्मू काश्मीरमध्ये देशभरातील पर्यटक फिरायला आले आहेत

जम्मू काश्मीरमध्ये पर्यटक फिरायला आले होते. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यामुळे सगळीकडंच वातावरण दहशतीचं तयार झालं आहे.

56
पुण्यातील कोण लोक होते?

पुण्यातील जगदाळे आणि गनबोटे हे दोन कुटुंबीय येथे आले होते. त्यांच्यातील दोघांना गोळ्या घालून मारण्यात आले आहे.

66
मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

मी दोनही कुटुंबाच्या संपर्कात आहे. त्यांना उपचारासाठी कोठे नेलं आहे हे लष्कराकडून अजूनही सांगण्यात आलं नाही.

Recommended Stories