भारतात पहिल्यांदा रेल्वेची सुरुवात कधी झाली माहितेय का?

Published : Apr 17, 2025, 08:33 AM IST

भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखोंच्या संख्येने दररोज नागरिक प्रवास करतात.रेल्वेसारख्या सार्वजनिक सोयीसुविधांमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे सोपे झाले आहे. पण तुम्हाला माहितेय का भारतात पहिल्यांदा रेल्वेची सुरुवात कधी झाली?

PREV
19
भारतातील पहिली रेल्वे

16 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिल्यांदा एक प्रवासी रेल्वे चालवण्यात आली होती.

29
कुठे चालवण्यात आली?

ही ट्रेन मुंबईतील बोरीबंदर स्थानकापसूनते ठाण्यापर्यंत चालवली गेली. यामधील एकूण अंतर 34 किलोमीटर होते.

39
पूर्व भारतात विस्तार

15 ऑगस्ट 1854 रोजी हावडा ते हुगळीपर्यंत रेल्वे चालवण्यात आली, ज्यामुळे पूर्व भारतात भारतीय रेल्वेचा विस्तार झाला होता.

49
दक्षिण भारतापर्यंत रुळ पोहोचले

1 जुलै 1856 रोजी चेन्नई ते वालाजाह रोडपर्यंत ट्रेन चालवण्यात आली. यामुळे दक्षिण भारतात भारतीय रेल्वे पोहोचली गेली.

59
आशियातील सर्वाधिक मोठे नेटवर्क

172 वर्षांनंतर भारतीय रेल्वे आशियातील सर्वाधिक मोठी आणि जगातील दुसरे सर्वाधिक मोठे नेटवर्क ठरले आहे.

69
प्रवाशांसाठी प्रवासाचा सुखकर मार्ग

भारतीय रेल्वेचे एकूण नेटवर्क 68 हजारांपेक्षा अधिक किलोमीटरचे असून याच्या माध्यमातून दररोज 2.3 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

79
कर्मचाऱ्यांची संख्या

13 हजारांपेक्षा अधिक रेल्वे आणि जवळजवळ 12 लाखांहून अधिक कर्मचारी रेल्वेत काम करतात.

89
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

भारतीय रेल्वेमध्ये आता QR Code आधारित बोर्डिंग सिस्टम, जीपीएस आधारित ट्रेन ट्रॅकिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

99
सेमी हाय-स्पीड एक्सप्रेस

भारतात पहिली सेमी-हायस्पीड ट्रेन Vande Bharart Express, राजधानी, शताब्दी, तेजस आणि गतिमान एक्सप्रेस आहे, या ट्रेन दिल्ली, मुंबई, कोलकातासारख्या मार्गावरुन धावतात.

Recommended Stories