ऑर्किड स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, आक्षेपार्ह अवस्थेतील 9 तरुणींसह 11 जणांना अटक!

Published : Nov 06, 2025, 07:23 PM IST
Orchid Spa Raid in Visakhapatnam Uncovers Sex Racket

सार

Orchid Spa Raid in Visakhapatnam Uncovers Sex Racket : स्पाचा परवाना काशीरेड्डी अरुण कुमार आणि राहुल यांच्या नावावर आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अनैतिक कामासाठी स्पा मध्ये येणाऱ्यांकडून ३००० रुपये घेतले जात होते.

Orchid Spa Raid in Visakhapatnam Uncovers Sex Racket : स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे विशाखापट्टणमच्या व्हीआयपी रोडवर असलेल्या 'ऑर्किड वेलनेस अँड स्पा सेंटर'वर छापा टाकून या टोळीला पकडण्यात आले. या घटनेत पोलिसांनी आक्षेपार्ह अवस्थेतील ९ तरुणी, स्पा चालवणारे दोघे आणि एका ग्राहकाला ताब्यात घेतले आहे. स्पामधील नऊ तरुणींची सुटका करून त्यांना निवारागृहात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी स्पाचे चालक कल्लुरू पवनकुमार (३६) आणि जन श्रीनिवास (३५) यांना अटक केली आहे.

स्पामध्ये मसाज सेवेच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर काल सायंकाळी ६.३० च्या सुमारास विशाखापट्टणम शहर पोलिसांच्या टास्क फोर्सने येथे तपासणी केली. तपासात हे आरोप खरे असल्याचे आढळून आले. त्यानंतर तपास पथकाने चालक आणि ग्राहकाला अटक केली. स्पाचा परवाना काशीरेड्डी अरुण कुमार आणि राहुल यांच्या नावावर आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

केवळ ३ हजार रुपयांत सुरु होता अनैतिक व्यवसाय

अनैतिक कामासाठी स्पा मध्ये येणाऱ्यांकडून ३००० रुपये घेतले जात होते, अशी माहिती समोर येत आहे. व्हॉट्सॲपद्वारे रक्कम आणि वेळ आधीच ठरवून ग्राहक येथे येत असल्याचेही पोलिसांना आढळून आले. या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तीन मोबाईल फोन आणि ७००० रुपये जप्त केले. ताब्यात घेतलेल्या ग्राहकाला पोलिसांनी जामिनावर सोडले. यामागे एक मोठी टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी सविस्तर तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Gold Price : डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला; सोन्याच्या दरात एका आठवड्यात चक्क 5 हजारांनी वाढ, वाचा दर
PM मोदींनी पुतिन यांना दिली खास भेट, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमिवर रशियन गीतेमागे कोणता मोठा संकेत?