
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नव उद्योजकांसाठी आणि जे तरुण युवा उद्योजक होण्याचं स्वप्न पाहत आहेत, यांच्यासाठी एक उदाहरण दिलं. या उदाहरणामागे कोणतंही काम आता प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही, तुम्ही किती चांगलं, सुंदर आणि दर्जेदार ते काम करतात त्यावर तुम्ही मोठे उद्योजक होवू शकतात, यासाठी त्यांनी हे उदाहरण दिले आहे. रोजगार शोधणारे बनण्यापेक्षा, रोजगार देणारे बना, अशी प्रेरणा देताना त्यांनी मुलांचा आत्मविश्वास देणारं हे उदाहरण दिलं आहे.