Chanda Kochhar: चंदा कोचर यांना मोठा दिलासा, खटला चालवण्याची परवानगी हायकोर्टाकडून रद्द

vivek panmand   | CMS
Published : Nov 18, 2026, 08:26 PM IST
deepak parekh and chanda kochhar

सार

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना बॉम्बे हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. व्हिडीओकॉन कर्ज फसवणूक प्रकरणात त्यांच्यावर खटला चालवण्यास बँकेने दिलेली परवानगी कोर्टाने रद्द केली आहे.

नवी दिल्ली: आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात चंदा कोचर यांच्यावर खटला चालवण्यासाठी दिलेली परवानगी बॉम्बे हायकोर्टाने रद्द केली आहे. चंदा कोचर यांच्यावर खटला चालवण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या बोर्डाने दिलेली परवानगी कायदेशीर नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. २०२३ मध्ये बँक बोर्डाने खटला चालवण्यास ही परवानगी दिली होती. २०१२ मध्ये व्हिडीओकॉन ग्रुपला दिलेल्या ३,२५० कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयने (CBI) तपास केला होता.

चंदा कोचर सीईओ असताना व्हिडीओकॉन ग्रुपला नियमांचं उल्लंघन करून कर्ज देण्यात आलं, आणि त्या बदल्यात चंदा यांच्या पतीच्या कंपनीत व्हिडीओकॉनने पैसे गुंतवले, असा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात सीबीआयने चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती, मात्र बॉम्बे हायकोर्टाने नंतर दोघांनाही अंतरिम जामीन मंजूर केला. या दोघांविरुद्ध ईडीने (ED) मनी लाँडरिंगचा गुन्हाही दाखल केला आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Delhi Protests: दिल्लीतील गजबजलेल्या भागात निदर्शनांवर बंदी? सुप्रीम कोर्टाची नोटीस
Shaina NC | Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हजारदा फाडू!' शायना एनसी