New SIM Binding Rule : सायबर फसवणूक रोखण्यासाठी आणि डिजिटल सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावलं उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून व्हॉट्सॲपसाठी 'सिम बाइंडिंग' नियम लवकरच लागू होणार आहे. जाणून घ्या हा नियम काय आहे.
भारतात व्हॉट्सॲप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. त्याला पर्याय म्हणून काही ॲप्स असली तरी, व्हॉट्सॲपच नंबर वन आहे. आता देशातील आयटी नियम अधिक कडक होत असून, डिजिटल सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार 'सिम बाइंडिंग' नियम आणत आहे.
25
काय आहे हा सिम बाइंडिंग नियम?
सायबर फसवणूक टाळण्यासाठी सरकार हा नियम आणत आहे. यानुसार, व्हॉट्सॲप वापरण्यासाठी, तुमचं नोंदणीकृत सिम कार्ड त्याच फोनमध्ये असणं बंधनकारक असेल. सध्या सिम कार्ड नसतानाही व्हॉट्सॲप चालतं, पण यापुढे ते शक्य होणार नाही.
35
सतत तपासणी प्रक्रिया
'सिम बाइंडिंग' लागू झाल्यावर तुम्ही फोनमधून सिम काढल्यास व्हॉट्सॲप काम करणार नाही. दुसऱ्या सिमवर नोंदणी केलेलं खातंही चालणार नाही. व्हॉट्सॲप आपोआप ही प्रक्रिया सतत तपासत राहील.
सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी हा बदल आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार, व्हॉट्सॲपला डिजिटल सुरक्षा वाढवण्यासाठी 'सिम बाइंडिंग' नियम लागू करावा लागेल.
55
सिम बाइंडिंग नियम तपासणीच्या टप्प्यात
सध्या 'सिम बाइंडिंग' नियमाची तपासणी सुरू आहे आणि तो लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं ॲक्टिव्ह सिम कार्ड फोनमध्येच असेल याची खात्री करा, अन्यथा केवळ व्हॉट्सॲपच नाही, तर इतर सेवांमध्येही अडथळा येऊ शकतो.