NEET Paper Leak प्रकरणात सीबीआयला मोठे यश, बिहार आणि झारखंड येथून दोन आरोपींना अटक

NEET Paper Leak: नीट युजी प्रकरणात सीबीआयला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात सीबीआयने मंगळवारी (16 जुलै) दोन आरोपींना बिहार आणि झारखंड येथून ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत सीबीआयने पेपर लीक प्रकरणात संपूर्ण देशभरातून डझनभर व्यक्तींना ताब्यात घेतले होते.

Chanda Mandavkar | Published : Jul 16, 2024 12:54 PM IST / Updated: Jul 16 2024, 06:27 PM IST

NEET Paper Leak Case : नीट यूजी पेपर लीक प्रकरणात सीबीआयने दोन जणांना अटक केली आहे. खरंतर, अटक करण्यात आलेल्या दोघांवर नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका चोरी करण्यासह व्हायरल केल्याचा आरोप आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची ओखळ बिहारची राजधानी पटना येथील पंकज कुमार आणि झारखंडमधील हजारीबाग येथील राजू सिंहच्या रुपात झाली आहे. प्रकरणात सीबीआयने कसून तपास केल्यानंतर देशभरातू डझनभर जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पंकज कुमारकडून प्रश्नपत्रिकांची चोरी
सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंकज कुमार उर्फ आदित्यने एका पेटीच्या माध्यमातून पेपर चोरी केले होते. नीट परीक्षेचे पेपर ज्या पेटीतून पाठवले जात होते, त्यामधून पंकजने पेपर काढले होते. आरोपीने पेपर स्टील पेटीमधून चोरल्यानंतर ते लीक करण्यासाठी दुसरा आरोपी राजूने पंकजची मदत घेतली.

पेपर लीकसाठी पंकजने कोणाची मदत घेतली?
हैराण करणारी गोष्ट अशी की, पंकजने पेपर अशावेळी चोरले जेव्हा ते नॅशनल टेस्ट एजेंसी (NTA) द्वारे पेपर पाठवले जात होते. यादरम्यान, दुसरा आरोपी राजू कुमारही पंकजची मदत करत होता. जेथे-जेथे पेपर चोरी केल्यानंतर पोहोचवायचे होते त्या सर्व ठिकाणी राजूने पोहोचवले.

इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे राजू
पंकज कुमारने जमशेदपूर येथून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पंकज बोकारो येथे राहणारा असून सीबीआयने त्याला पटना येथून ताब्यात घेतले आहेय. याशिवाय राजू सिंहला हजारीबाग येथून अटक केली आहे.

पेपर लीक प्रकरणात आतापर्यंत 15 जण ताब्यात
नीट यूजी पेपर लीक प्रकरणात सीआयीने आधीच 13 जणांना तब्यात घेतले होते. आता पंकज आणि राजूलाही अटक केली आहे. अशाप्रकारे नीट यूजी प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक झाली आहे. शुक्रवारी पटना हायकोर्टाने सर्व 13 आरोपींची रिमांड मिळाल्यानंतर सीबीआय मंगळवारी बेऊर तुरुंगात पोहोचली. तुरुंगातील काही आरोपींची चौकशी केल्यानंतर टीम सर्वांना घेऊन पटना येथील कार्यलयात पोहोचली. येथे टीमच्या सदस्यांनी सर्व आरोपींची वन टू वन चौकशी केली.

नीट यूजीची 5 मे रोजी परीक्षा
नीट यूजी-2024 परीक्षेचे आयोजन 5 मे रोजी आयोजन करण्यात आले होते. परीक्षेसाठी 23.33 लाख विद्यार्थी देशातील 571 शहरातील 4750 केंद्रावर परीक्षेसाठी आले होते. यामध्ये 14 परदेशातील शहरांचाही समावेश होता. परीक्षेचा निकाल 4 जूनला जारी करण्यात आले. पण मोठ्या संख्येने टॉपर्स समोर आल्यानंतर सोशल मीडियावर पेपर लीक झाल्याच्या बातमीने जोर पकडला होता. यानंतर घटनेचा तपास सीबीआयकडून केला जात आहे.

आणखी वाचा : 

NTA आणि परीक्षा पॅनेलमध्ये किती त्रुटी? सुधारणेसाठीच्या सूचना घ्या जाणून

एकापेक्षा अधिक सिम कार्ड ठेवताय तर व्हा सावधान!, तुम्हालाही होऊ शकतो तुरुंगवास आणि 2 लाखांचा दंड

Share this article