पश्चिम बंगालमधील खेळाडूंवर ममता बॅनर्जी सरकारकडून अन्याय, भाजप प्रभारी अमित मालवीय यांनी केले 'हे' आरोप

पश्चिम बंगाल येथे खेळाडूंची हेटाळणा होत असल्याची बाब भाजपचे पश्चिम बंगाल प्रभारी अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटद्वारे उघड केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी खेळाडूंचा उल्लेख केला आहे. 

vivek panmand | Published : Jul 16, 2024 9:19 AM IST

पश्चिम बंगाल येथे खेळाडूंची हेटाळणा होत असल्याचे दिसत होत आहे. भाजपचे पश्चिम बंगाल येथील प्रभारी अमित मालवीय यांनी याबाबतचे ट्विट केले असून ते मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये येथील खेळाडूंच्या बाबतीत हेटाळणी होत असून त्यांना न्याय मिळत नसल्याबद्दल लिहिले आहे. हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. 

अमित मालवीय ट्विटमध्ये काय म्हणतात? - 
अमित मालवीय यांनी ट्विटमध्ये काही नाव सांगितली असून यामध्ये अतनु दास, बारानगर येथील धनुर्धारी प्रणती नायक, झारग्राममधील आर्टिस्टिक जिम्नॅस्ट सुतीर्थ मुखर्जी, नैहाटी येथील टेबल टेनिसपटू अनिर्बन लाहिरी, एक अनिवासी बंगाली गोल्फर आभा खटुआ, मेदिनीपूरचे शॉट पुटर अनुष अग्रवाला, कोलकाता येथील घोडेस्वार अंकिता भकट, कोलकाता येथील तिरंदाज या नावांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. 

ते पुढे म्हणतात की, या खेळाडूंनी पश्चिम बंगालचे नाव मोठे केले असून भविष्यात ते चांगली कामगिरी करतील अशी आपल्या सर्वांना आशा आहे. पण या सर्व गुणवान खेळाडूंना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत प्राप्त झाली नाही. या खेळाडूंना येथील सरकारकडून मदत मिळत नसल्यामुळे दुसऱ्या सरकारकडून त्यांना प्रायोजकत्व आणि मदत घेण्यासाठी भाग पाडले जाते. 

'बंगलार निजेर मेये' प्रशासन बंगालची आंतरिक क्षमता खुंटवण्यासाठी दोषी आहे. बंगालचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी आणि आपल्या खेळाडूंना योग्य ओळख मिळवून देण्यासाठी आपण या अक्षम राजवटीच्या विरोधात उठणे अत्यावश्यक आहे! अशा प्रकारचे ट्विट मालवीय यांनी केले असून सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 
आणखी वाचा - 
NTA आणि परीक्षा पॅनेलमध्ये किती त्रुटी? सुधारणेसाठीच्या सूचना घ्या जाणून
पुरी जगन्नाथाच्या रत्नांच्या भांडाराचे रहस्य काय आहे, 46 वर्षांपासून तिजोरी का बंद होती?

Share this article