NEET Result : NEET निकालात हे काय? 2 तासांत 2 वेगवेगळे स्कोअर, विद्यार्थी हैराण

Published : Jul 24, 2026, 11:52 AM IST
NEET Result : NEET निकालात हे काय? 2 तासांत 2 वेगवेगळे स्कोअर, विद्यार्थी हैराण

सार

अंतिम उत्तर तालिकेनुसार (Final Answer Key) मिळणारे मार्क आणि प्रत्यक्ष निकालातील मार्क यात तफावत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. काही विद्यार्थ्यांना तर दोन तासांत दोन वेगवेगळे स्कोअर दिसले.

नवी दिल्ली : नीट (NEET) परीक्षेच्या निकालावरून आता आणखी विद्यार्थी पुढे आले असून त्यांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. फक्त दोन तासांच्या अंतराने वेबसाइटवर दोन वेगवेगळे स्कोअर दाखवण्यात आल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने केली आहे.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील आर्या सिंग नावाच्या विद्यार्थिनीने ही तक्रार केली आहे. तिने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि शिक्षण मंत्र्यांना याबद्दल सविस्तर तक्रार पाठवली आहे. एवढंच नाही, तर बिहारच्या मधेपुरा येथील एका विद्यार्थिनीला परीक्षेला हजर असूनही तिला गैरहजर दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

अनेक विद्यार्थ्यांनी अंतिम उत्तर तालिकेनुसार (Final Answer Key) मिळणारे गुण आणि अधिकृत निकालात जाहीर झालेले गुण यात मोठा फरक असल्याचा आरोप केला आहे. या वाढत्या गोंधळामुळे सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल यांनी एनटीएला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांवर एनटीएने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. नियमांनुसार तक्रार दाखल केल्यास प्रत्येक प्रकरणाची तपासणी करून ते सोडवलं जाईल, असं एनटीएने म्हटलं आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Supreme Court On Election Commission: मतदानाचा हक्क कायमचा हिरावून घेता येईल का? ४३ लाख मतदार गेले कुठे? सुप्रीम कोर्टाचा सवाल
Raj Thackeray Karjat Speech | राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण | Karjat Torrent