Naushad Siddiqui: 'पाकीट' चिन्ह परत मिळवण्यासाठी नौशाद सिद्दीकी हायकोर्टात

vivek panmand   | CMS
Published : Sep 21, 2026, 06:47 PM IST
Naushad Siddiqui: 'पाकीट' चिन्ह परत मिळवण्यासाठी नौशाद सिद्दीकी हायकोर्टात

सार

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर तृणमूल काँग्रेसने 'दोन फुलं' हे चिन्ह गमावलं आहे. आता आयोगाने दिलेल्या 'पाकीट' चिन्हावरून ममता बॅनर्जी आणि आयएसएफ पक्षात नवा वाद सुरू झालाय. नेमकं काय घडलंय? सविस्तर वाचा.

Naushad Siddiqui News: 'पाकीट' हे निवडणूक चिन्ह परत मिळवण्यासाठी आयएसएफचे (ISF) आमदार नौशाद सिद्दीकी यांनी थेट कलकत्ता हायकोर्टात धाव घेतली आहे. आगामी दोन विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये ऋतब्रत यांचा गट 'डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस' या नावाने आणि 'पाकीट' या चिन्हावर लढणार आहे, असं निवडणूक आयोगाने आपल्या अंतरिम आदेशात स्पष्ट केलंय.

नौशाद विरुद्ध ममता! 'पाकीट' चिन्हावरून वाद:-

या निर्णयानंतर 'पाकीट' चिन्हावरून नवा वाद पेटला आहे. डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेसला हे चिन्ह देण्याच्या निर्णयाला भांगरचे आयएसएफ आमदार नौशाद सिद्दीकी यांनी कडाडून विरोध केलाय. त्यांनी याविरोधात कलकत्ता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता पोटनिवडणुकीत आयएसएफला 'पाकिटा'ऐवजी 'कपाट' या चिन्हावर लढावं लागणार आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आयएसएफने याच 'पाकीट' चिन्हावर निवडणूक लढवली होती. आताच्या दोन पोटनिवडणुकांमध्येही त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. असं असताना त्यांचं हक्काचं चिन्ह दुसऱ्या पक्षाला देण्यावर नौशाद यांच्या आयएसएफने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

नंदीग्राममध्ये रातोरात एक नवा पक्ष 'मान्यताप्राप्त' कसा झाला आणि त्यांना 'पाकीट' चिन्ह कसं मिळालं, असा सवाल नौशाद यांनी उपस्थित केलाय. याप्रकरणी त्यांनी सोमवारी न्यायमूर्ती कृष्णा राव यांच्या खंडपीठासमोर खटला दाखल केला असून, यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी ते करणार आहेत.

विशेष म्हणजे, स्वतःच्या हाताने बांधलेला पक्ष आणि स्वतः रेखाटलेलं चिन्ह आता माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे राहिलेलं नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर कालीघाट तृणमूल विरुद्ध ऋतब्रत तृणमूल असा चिन्हाचा वाद मिटला असून पक्षाचे नाव आणि चिन्ह निश्चित करण्यात आले आहे. ममता गटाचे उमेदवार आता 'फुटबॉल खेळाडू' या चिन्हावर लढतील, तर ऋतब्रत यांचे उमेदवार 'पाकीट' चिन्हावर रिंगणात उतरतील. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी म्हणाले, "अति गर्वामुळे अहंकार धुळीस मिळाला आहे."

'दोन फुलं' हे चिन्ह हातातून गेल्यानंतर शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूलच्या संस्थापिका आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करून आणि सर्वांचं म्हणणं ऐकूनही त्यांना आपला पक्ष एकसंध ठेवता आला नाही. पक्षाचे दोन-तीन-चार तुकडे झाले. याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच आहे. याच्याशी आमच्या भाजपचा कोणताही संबंध नाही." ते पुढे म्हणाले, “निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच मी हल्दियामधून सांगितलं होतं की, दुसरं कोणीही राहो, पण तृणमूल पक्ष शिल्लक राहणार नाही.”

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरवर मात केल्यानंतरही तो पुन्हा होऊ शकतो का? जाणून घ्या लक्षणे
Bengaluru Heavy Rain: बंगळुरूत मुसळधार पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आणि ट्रॅफिक जॅम