देशात नवीन सरकार स्थापन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी कृतीत दिसले पाहिजेत. नवीन सरकार सत्तेवर येताच पहिला निर्णय घेऊन त्यांनी सरकारची शेतकरी हिताची बांधिलकी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
देशात नवीन सरकार स्थापन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी कृतीत दिसले पाहिजेत. नवीन सरकार सत्तेवर येताच पहिला निर्णय घेऊन त्यांनी सरकारची शेतकरी हिताची बांधिलकी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी किसान निधीच्या प्रकाशनाशी संबंधित असलेल्या पहिल्या अधिकृत फाइलवर स्वाक्षरी केली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी करण्यात येणारी पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित असावी.
नरेंद्र मोदींनी कोणत्या फाईलवर केली स्वाक्षरी
किसान निधी योजनेशी संबंधित फाइलवर स्वाक्षरी करताना पीएम मोदी म्हणाले की, आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधीच्या १७ व्या हप्त्याला मंजुरी देत त्यांच्या पहिल्या फाइलवर स्वाक्षरी केली. याचा फायदा ९.३ कोटी शेतकऱ्यांना होणार असून सुमारे २०,००० कोटी रुपये वितरित केले जातील.