मुंबई - जिओ आपल्या आकर्षक ऑफर्स आणि सेवांमुळे ग्राहकांची संख्या आणि व्यवसाय वाढवत आहे. जून महिन्यात संपलेल्या चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत मुकेश अंबानींच्या जिओने तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
मुकेश अंबानींचा बिझनेस प्लॅन पक्का. चढउतार असतील पण नफा मिळेलच. आता अंबानींनी कोट्यवधींचा नफा कमावला आहे. जिओ नेटवर्क, जिओ फायबर अशा अनेक सेवा देत आहे. आता जिओने भरघोस नफा कमावला आहे.
25
नफ्यात २५% वाढ
जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत ₹७,११० कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यात २५% वाढ झाली आहे. जून तिमाहीत कंपनीचे उत्पन्न १९% वाढून ₹४१,०५४ कोटींवर पोहोचले आहे.
35
जगातील सर्वात मोठी फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस सेवा
२०० मिलियन ५G ग्राहक आणि २० मिलियन होम कनेक्शनसह जिओने नवनवे टप्पे गाठले आहेत, असे मुकेश अंबानी म्हणाले. जिओ फायबर ७.४ मिलियन ग्राहकांसह जगातील सर्वात मोठी फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस सेवा कंपनी बनली आहे.
जिओ अत्याधुनिक तंत्रज्ञान पायाभूत सुविधा निर्माण करत राहील आणि ५G आणि फिक्स्ड ब्रॉडबँड सेवेत अग्रेसर राहील. हे देशात AI वापर वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरेल, असे आकाश अंबानी म्हणाले.
55
९.९ मिलियन नवीन ग्राहक मिळवले
रिलायन्स जिओने ५G सेवेत क्रांती घडवली आहे. २०० मिलियनहून अधिक ग्राहकांसह जिओ ५G दररोज नवनवे ऑफर्स देत आहे. या तिमाहीत जिओने ९.९ मिलियन नवीन ग्राहक मिळवले आहेत.