Viral Love Story: प्रेयसीच्या घरच्यांना मनवण्यासाठी पठ्ठ्याने गुडघ्यावर चढल्या ११०० पायऱ्या!

vivek panmand   | CMS
Published : Oct 16, 2026, 10:30 PM IST
Viral Love Story: प्रेयसीच्या घरच्यांना मनवण्यासाठी पठ्ठ्याने गुडघ्यावर चढल्या ११०० पायऱ्या!

सार

मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या घरच्यांना लग्नासाठी राजी करण्यासाठी चक्क गुडघ्यावर चालत मैहरच्या माँ शारदा देवी मंदिराच्या ११०० पायऱ्या चढल्या आहेत. आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी त्याने केलेल्या या धाडसाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावर नेटकरी आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

प्रेमात पडल्यावर माणूस काय करेल याचा काही नेम नसतो. काहींसाठी प्रेम म्हणजे फक्त टाईमपास असतो, तर काहींसाठी तेच त्यांचं आयुष्य बनतं. प्रेमात पडणं सोपं असतं, पण घरच्यांना लग्नासाठी राजी करणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं. त्यात जर जातीचा प्रश्न असेल, मुलाकडे चांगली नोकरी नसेल किंवा मुलीच्या घरच्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या असतील, तर हे काम आणखीच कठीण होऊन बसतं. अशा अनेक कारणांमुळे बऱ्याचदा प्रेम अपूर्ण राहतं.

याच पार्श्वभूमीवर एका तरुणाने आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी एक भन्नाट पाऊल उचललं आहे. प्रेयसीवर आपलं किती प्रेम आहे हे तिच्या घरच्यांना दाखवून देण्यासाठी या पठ्ठ्याने चक्क गुडघ्यावर चालत मंदिराच्या ११०० पायऱ्या चढल्या आहेत. मध्य प्रदेशातील मैहर येथील माँ शारदा देवी मंदिरात हा प्रकार घडला असून, त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

गुडघ्यावर चढला ११०० पायऱ्या

हा तरुण मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील केओलारी गावचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. मैहर येथील माँ शारदा देवीच्या मंदिरात जाण्यासाठी तब्बल ११०० पायऱ्या चढाव्या लागतात. या तरुणाने हातात दिवा घेऊन या सर्व पायऱ्या गुडघ्यावर चालत पार केल्या. प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला होकार द्यावा, यासाठी त्याने हा नवस केला होता.

नेटकऱ्यांचा सल्ला

या घटनेची आता इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली आहे. या तरुणाचा नवस फळाला आला की नाही, हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण सोशल मीडियावर मात्र तो चांगलाच चर्चेत आला आहे. काही लोक याला 'खरे प्रेम' म्हणत आहेत, तर काही जण त्याला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. "एखाद्या मुलीसाठी स्वतःचं आयुष्य खराब करू नकोस, आधी ती कशी आहे ते बघ, आजकाल बऱ्याच जणांसाठी प्रेम हा फक्त टाईमपास असतो," अशा कमेंट्स लोक करत आहेत. काहीही असलं तरी, सध्या हा तरुण सोशल मीडियाचा हिरो बनला आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video: ट्युशन बुडवून पोरगा गरबा खेळायला गेला, तिथेच सर भेटले अन्...
YouTuber Bhoomika: युट्यूबर भूमिकानं करून दाखवलं! हट्टानं घरी आणली महिंद्रा Thar Roxx