Monsoon Arrive : मान्सून केरळमध्ये दाखल, 16 वर्षांत पहिल्यांदाच 8 दिवस आधी हजेरी

Published : May 24, 2025, 01:48 PM ISTUpdated : May 24, 2025, 02:00 PM IST
mp monsoon forecast 2025 heavy rainfall

सार

Monsoon Updates : मान्सून केरळामध्ये आठ दिवस आधीच दाखल झाला आहे. खरंतर, 16 वर्षांमध्ये पहिल्यांदा मान्सून केरळात लवकर सुरू झाला आहे. यंदा सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण एल निनो स्थिती निर्माण होणार नाही.

Monsoon Updates : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून शनिवारी, २४ मे २०२५ रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. सामान्यतः मान्सून १ जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. मात्र यंदा तो तब्बल ८ दिवस आधीच दाखल झाला असून, १६ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. याआधी २००९ मध्ये २३ मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचला होता.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, केरळमध्ये मान्सून लवकर किंवा उशिरा पोहोचणे हे देशभरातील मान्सूनच्या प्रगतीचं निश्चित सूचक नाही. मान्सूनची गती आणि प्रभाव हे जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक हवामान घटकांवर अवलंबून असतात.

 

यंदाच्या मान्सून हंगामात सामान्यपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. एप्रिल महिन्यात हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजात २०२५ मध्ये एल निनो स्थिती उद्भवणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे देशात समाधानकारक मान्सून होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

खाजगी हवामान संस्था स्कायमेटनेही यंदा देशभरात सरासरीच्या १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान मान्सून समाधानकारक राहील आणि महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडेल, असा दावा त्यांनी केला आहे.

मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, पश्चिम-मध्य आणि पूर्व-मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप, केरळ, माहे, कर्नाटकचा काही भाग, मालदीवचा उर्वरित भाग, कोमोरिन भाग, तसेच तामिळनाडूचा मोठा भाग व्यापला आहे. याशिवाय नैऋत्य व पूर्व-मध्य बंगाल उपसागराचा उर्वरित भाग, पश्चिम-मध्य व उत्तर बंगाल उपसागराचा काही भाग आणि मिझोरामचा काही भागही मान्सूनच्या क्षेत्रात आलेला आहे. पुढील वाटचालीसाठी हवामान अनुकूल असून, मान्सून वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!