Nedumangad Hotel Fire: तिरुअनंतपुरमच्या हॉटेलमध्ये अल फहम ग्रिलला आग, मोठा अनर्थ टळला

vivek panmand   | CMS
Published : Oct 11, 2026, 04:43 PM IST
Nedumangad Hotel Fire: तिरुअनंतपुरमच्या हॉटेलमध्ये अल फहम ग्रिलला आग, मोठा अनर्थ टळला

सार

हॉटेलच्या स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी बाहेर धाव घेतली. परिसरात धुराचे लोट पसरल्याने बचावकार्यातही अडथळे आले.

तिरुअनंतपुरम: नेंदुमंगाड येथील वाळीकोड भागात एका हॉटेलला भीषण आग लागली. अल फहम बनवणाऱ्या भट्टीची आग थेट चिमणीपर्यंत पोहोचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. 'झमझम' हॉटेलमध्ये अल फहम ग्रिलिंगच्या भट्टीतून निघालेली आग चिमणीतून वेगाने वर पसरत होती. स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा सुरू केल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आणि जीव वाचवण्यासाठी त्यांनी बाहेर धाव घेतली. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याने बचावकार्यातही मोठे अडथळे येत होते. घटनेची माहिती मिळताच नेंदुमंगाड अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हॉटेलच्या पुढच्या बाजूने पाण्याचा मारा सुरू केला आणि आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला, असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झालेले नाही.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

IndiGo Flight Fire: दिल्ली-चेन्नई इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट, विमान हैदराबादकडे वळवले
Delhi Unrest: सुट्टीच्या दिवशीही दिल्लीत राडा, डाव्यांच्या आंदोलनात पोलिसांची धरपकड; खासदार जॉन ब्रिटास ताब्यात